• Sun. Sep 6th, 2026

गॅस, पेट्रोल, डिझेलबाबत PM मोदींच्या सूचना; आता देवेंद्र फडणवीसांचंही महत्त्वाचं विधान

गॅस, पेट्रोल, डिझेलबाबत PM मोदींच्या सूचना; आता देवेंद्र फडणवीसांचंही महत्त्वाचं विधान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वर्षभर सोनं खरेदी करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलं आहे. फक्त सोनंच नाही तर पेट्रोल, डिझेलच्या वापराबाबतही पंतप्रधानांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हैदराबादमध्ये पार पडलेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी भारतीयांना उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे जगात मोठं तेलसंकट ओढावलं आहे. युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होत असून भारतालाही या युद्धाची झळ बसत आहे. म्हणूनच या संकट काळात पुढचे एक वर्ष तरी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. यासोबतच पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. तर मोदींनी केलेल्या या आवाहनानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed