Maharashtra Weather:भारतीय हवामान विभागाने सोमवार, 11 मे रोजी राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट, वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा इशारा जारी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल दिसून येणार आहे.
म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘मान्सून’च्या आगमनाचे अंदाज एकीकडे व्यक्त केले जात असताना, उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, मे महिन्याच्या पूर्वार्धातच शहरातील कमाल तापमान ४१ अंशांच्या पार गेले आहे. रविवारी शहरात ४१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, २०१६नंतरचे मे महिन्यातील शहराचे हे उच्चांकी कमाल तापमान ठरले.
पुण्यातील हवामान कसं असेल?
शहरात दिवसभर उन्हाच्या झळांसह जाणवणारा उकाडा रात्रीही कायम राहिल्याने पुणेकर रविवारी सुट्टीच्या दिवशी हैराण झाले होते. शहरात रविवारी कमाल तापमानाने चाळीसचा टप्पा ओलांडला होता. शिवाजीनगर येथे ४१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरी ३.४ अंश सेल्सिअसने सामान्यापेक्षा अधिक ठरले. सन २०१६ नंतरही यंदाची ही उच्चांकी नोंद झाली आहे. शहरात या आठवड्यात कमाल तापमानात ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.Weather Update: उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?
हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला असताना काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावासाचा अलर्टही जारी केला आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह अनेक भागांत तीव्र उष्णतेसह वादळी वारे आणि पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पण तापमानाचा पारा मात्र उतरणार नसून 33 ते 36 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात सोमवारी तापमान कोरडं राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. अहिल्यानगरमध्ये काही भागांत हलक्या पावासची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमान 42 अंशावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
मान्सूनपूर्वी सुरू होणार Goregaon-Mulund Link Roadचा पहिला टप्पा; उड्डाणपुलामुळे कोंडी फुटणार; पूर्व-पश्चिम जोडणीला गती
मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोलीमध्येही अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील तापमान चढेच असून काही जिल्ह्यांमध्ये 44 अंशावर गेलं आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तापमान उष्ण असले तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा