Versova-Dahisar Coastal Road: कोस्टल रोडवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी महापालिके 10 नवे पर्यायी मार्ग तयार करणार आहे. कोस्टल रोडच्या उत्तरेकडील भागाचं काम करताना हे इंटरचेंज बनवले जातील.
मुंबईतली कोस्टल रोडचा पहिला टप्पा दक्षिण भागात आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून सुरू होऊन वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीकडील भागाजवळ समाप्त होतो. हा संपूर्ण कोस्टल रोड 10.58 किमी लांब आहे. या मार्गामुळे मरिन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान अंतर 40 मिनिटांवरून केवळ 10 – 12 मिनिटांवर पोहोचलं आहे.
Mumbai-Pune Expressway’s Missing Link: 10 दिवसांत एक्स्प्रेस वेचं चित्र बदललं; 70 टक्के वाहनांची वाहतूक ‘कनेक्टिंग लिंक’वर वळवली, अपघात, कोंडीतून सुटका
कशामुळे कोंडी होते?
दरम्यान, या कोस्टल रोडचा विस्तार मुंबईच्या उत्तरेकडेही होणार आहे. वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडमुळे उत्तर ते दक्षिण प्रवासासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंकिंग रोड आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील (SV Road) वाहतूक कोंडी कमी होणार आहे. कोस्टल रोडवर सिग्नलमुक्त प्रवास होत असला तरी मार्गाच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर कोंडी होते. कोस्टल रोडवरील वाहतूक एका दिशेने चालते. त्यामुळे प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीही प्रत्येकी एक-एक पर्याय आहेत. सर्व रस्त्यांवरील वाहतूक या एकाच बिंदूवरून कोस्टल रोडवर जाते किंवा तिथून बाहेर निघते. त्यामुळे मार्गाच्या क्षमतेवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी होते.
यासाठी महापालिके कोस्टल रोडवरून बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्ग देणार आहे. एकमेव प्रवेश आणि बाहेर पडण्याचे ठिकाणांऐवजी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या मधूनच वाहनं बाहेर किंवा मार्गावर प्रवेश करू शकतील. या 22.9 किमी वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडला 10 वेग वेगळ्या ठिकाणी इंटरचेंजद्वारे जोडण्यात येणार आहे.
10 टप्प्यांत विकास होणार
1. जुहू विले पार्ले डेव्हलपमेंट स्कीम (JVPD)वरील उड्डाणपुलाला कोस्टल रोडशी जोडण्यात येणार आहे. सर्वप्रथम हा उड्डाणपूल वर्सोवा लिंक रोडला जोडला जाईल, त्यापुढे वर्सोवा वांद्रे सी लिंक कनेक्टरद्वारे कोस्टल रोडवर पोहोचेल.
2. आता काम सुरू असलेल्या वर्सोवा-मढ पुलालाही मढच्या लोखंडवाला इंटरचेंजजवळ कोस्टल रोडशी जोडणार आहे. या मार्गावरून प्रवासी पश्चिम द्रुतगती मार्गावर पोहोचू शकतील. त्यासह पुढे जोगेश्वरी वर्सोवा लिंक रोडला जोडणाऱ्या मार्गालाही जोडले जाईल.
3. दरम्यान, लोखंडवाला इंटरचेंजजवळ गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलालाही जोडले जाणार आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणं सोपं होईल.
4. यापुढे मालाडमधील आगामी रामचंद्र नाला पुलाला कोस्टल रोडशी माइंडस्पेस इंटरचेंजजवल जोडले जाणार आहे.
5. दरम्यान, सेक्टर 8 मधील चारकोप इंटरचेंजमध्ये पोईसर जंक्शनजवळ SV Roadशी जोडले जाणार आहे.
6. गोराई इंटरचेंजवरील लिंक रोडला कोस्टल रोडशी जोडणार असून कोरा केंद्रापर्यंत पोहोचता येईल.
7. त्यासह दहिसर कनेक्टरवरील लिंक रोडलाही जोडण्यात येणार आहे. पुढे एसव्ही मार्गापर्यंत प्रवास शक्य होईल.
8. कंदरपाडा रोटरीलाही कोस्टल रोडशी जोडण्यात येणार आहे.
9. याशिवाय महापालिके गोरेगाव आणि मागाठाणेदरम्यान एख 5.5 किमी लांब हाय-स्पीड कॉरिडोर तयार करत असून तोही कोस्टल रोडशी जोडला जाईल. या मार्गामुळे कोस्टल रोडला गोरेगाव-मुलुंड लिंक रोडशी जोडणी मिळणार आहे.
10. शेवटी, भाईंदर रोटरीजवळ सुद्धा इंटरचेंज बनवले जातील ज्यामुळे काशिमिरा जंक्शनपर्यंत पोहोचता येणार आहे.
Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! वादळी पावसाचा इशारा तरीही तापमान चढेच राहणार; मराठवाडा, विदर्भ, कोकणात ‘अलर्ट’
संपूर्ण वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड 22.9 किमी लांब आहे. यामधील पहिला टप्पा वर्सोवापासून बांगूर नगरपर्यंत असून, 4.5 किमी लांब असेल. दुसरा 3.12 किमी लांब टप्पा गोरेगाव ते माइंडस्पेस बनवला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात माइंडस्पेस ते चारकोपपर्यंत 3.9 किमी लांब दुहेरी बोगदे असतील. चौथ्या टप्प्यात चारकोप ते गोराई 3.78 किमी लांब मार्ग बांधणार आहेत. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात गोराई ते दहिसर मार्ग असेल.
