• Sun. Jun 7th, 2026

    Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी

    Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी

    Buldhana Crime: चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात तरुणीच्या वडील आणि भावाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    बुलढाणा क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीची तिचे वडील आणि भावानेच हत्या केली. चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सलग बारा दिवस तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मृत महिलेचे सासर अमरावती जिल्ह्यातील आहे.

    जळगाव जामोद पोलिस ठाण्यात २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात एका महिलेचे धड अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी १२ दिवस तपास करून खकनार येथील कलमेकर बापलेकाला ताब्यात घेतले.

    Maharashtra TimesBuldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेले अन् तर्राट झाले; बंदिवानासोबत दारु पिणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल
    लग्नाच्या पाचव्या दिवशी खून
    मृत युवतीचा विवाह १५ एप्रिल रोजी खाऱ्या टेंभूर (धारणी, जि. अमरावती) येथील युवकासोबत झाला होता. पाच दिवसांनी, २० एप्रिल रोजी ती माहेरी खडकी येथे आली होती. तिचे चुलत भावासोबतच प्रेम होते. लग्नानंतरही ती ऐकत नसल्याने २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास शिवानीची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली.

    Rohit Pawar vs Sanjay Gaikwad | रामायणातही श्रीरामांचा एकेरी उल्लेख, पवार वि. संजय गायकवाड जुंपली

    विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू
    भंडारा : शेतात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने एका ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. महेंद्र धनराज बिरे रा. शिवनी (मोहाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिरे हे शेतात पिकांवर औषध फवारणी करीत होते. फवारणी सुरू असतानाच त्यांना विषबाधा झाली आणि त्यांची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने भंडाऱ्याला हलविले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा