• Tue. Sep 8th, 2026
राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर


Latest Marathi News: भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची ‘एसआयटी’ने तब्बल सहा तास चौकशी केली. आर्थिक व्यवहार, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांतील सहभागासह पीडितांच्या जबाबातील मुद्द्यांचा त्यात समावेश होता. दरम्यान, विविध प्रकारच्या इंधनांचा वापर जपून आणि काटकसरीने करा, इंधन वाचवण्यासाठी घरून काम करा, अनावश्यक परदेश दौरे टाळा तसेच पुढील वर्षभर सोनेखरेदी करून नका, असे स्पष्ट आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना केले. तेलंगणातील सुमारे ९,४०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे व्हर्च्युअल माध्यमातून भूमिपूजन व उद्घाटन केल्यानंतर त्यांनी काटकसरीची त्रिसूत्री दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed