Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर होत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
कळंब तालुक्यातील पंगडी येथे ही घटना घडली. जखमी गजानन वसंता मोरे (वय ३८) यांच्या तक्रारीनुसार, पत्नी कवडी (वय ३५) व तिचा प्रियकर विष्णू कडू आत्राम (वय ४५) यांच्यात अनैतिक संबंध होते. या बाबत त्यांना वारंवार हटकले होते.
Tiger Attack: गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या दिवशी घटना, परिसरात घबराट
पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने ३ मे रोजी मध्यरात्री गजानन झोपले असताना पत्नीने प्रियकराच्या मदतीने विजेच्या वायरला अल्युमिनियमची तार बांधून त्यांना शॉक दिला. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात गजानन हे जखमी झाले. ८ मे रोजी गजानन यांनी वडगाव जंगल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१) ६१ (३) अंतर्गत गुन्हे दाखल केले.
Sangli News : कुटुंबासोबत साखरझोपेत, छातीवर गोळ्या झाडत झोपेतच संपवलं; MSEBच्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या
तर दुसऱ्या एका घटनेत, अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार तिघांनी चाकूचा धाक दाखवित लुटले. ही घटना वाडी परिसरातील अमरावती महामार्गावरील पंजाबी ढाबा परिसरात घडली. विशाल वीरेंद्र कोठारी (वय २०, रा. क्वेटा कॉलनी, लकडगंज) हे मित्रांसह कारने गोंडखैरी येथील पंजाबी ढाबा परिसरातून येत असताना त्याच्या कारचा टायर फुटल्याने वाहन डिव्हायडरला धडकले. यात विशाल यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली. मदतीसाठी मित्रांनी पल्सर दुचाकीवरील दोन तरुणांना थांबविले. आरोपींनी विशाल यांना दुचाकीवर बसवून सुराबर्डी रोडवरील न्यू म्हाडा कॉलनी परिसरात नेले. तेथे त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला बोलावून तिघांनी चाकूचा धाक दाखवत रोख अडीच हजार आणि १५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावला. दरम्यान, मित्र घटनास्थळी पोहोचताच आरोपी पसार झाले.
