• Sat. Jun 13th, 2026
    Tiger Attack: गोंदियात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या दिवशी घटना, परिसरात घबराट

    Gondia Tiger Attack: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला. यात त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे (६५) रा. वडेगाव बंध्या असे आहे.

    केशोरी नियतक्षेत्रात वडेगाव बंध्या हा परिसर येतो. या परिसरातील कक्ष क्रमांक २८२मध्ये कौशल्या या आपल्या सुनेसह तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कौशल्या या अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. त्या १ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना ही घटना घडली.
    Maharashtra TimesSangli News : कुटुंबासोबत साखरझोपेत, छातीवर गोळ्या झाडत झोपेतच संपवलं; MSEBच्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

    बोंडगाव-सुरबन परिसरात ९ मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सततच्या या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे. वनविभागाने सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

    Maharashtra TimesPM Modi यांचं खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचं, सोने वर्षभर खरेदी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया काय?
    रानडुक्कर, अस्वलाचेही हल्ले
    देवरी तालुक्यात सोमवारी अस्वल आणि रानडुकराने केलेल्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. ओवारा येथील वनमाला बोरकर (५५) व डोंगरगाव येथील भुमेश्वरी डोये (४०)यांच्यावर रानडुकराने तर देवाटोला येथील हिरणबाई वाढिवे (५४)यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. रानडुकराने हल्ला केलेल्या जखमी महिलांना गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अस्वलाने हल्ला केलेल्या महिलेला आमगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
    Maharashtra TimesShrikant Shinde Daura: श्रीकांत शिंदेंचा राज्यव्यापी दौरा; 22 जिल्हे अन् 100हून अधिक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार, कसा असेल दौरा?
    ताडोब्यात तीन नवे पाहुणे
    ‘वीरा’ वाघिणीच्या बछड्यांची संख्या १३वर

    ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमधील पळसगाव परिसरातील प्रख्यात वीरा वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. हे बछडे आता सुमारे दोन ते अडीच महिन्यांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ताडोब्यात वीरा या वाघिणीची ही चौथी प्रसूती आहे. आतापर्यंत तिने जन्म दिलेल्या बछड्यांची संख्या १३वर पोहोचली आहे. या वाघिणीने पहिल्यांदा बेलारा-गोंडा मोहाळी परिसरात दोन बछड्यांना, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रसूतीत प्रत्येकी चार अशा आठ बछड्यांना जन्म दिला होता. देशात ताडोबा हे वाघांसाठीच्या उत्तम प्रजनन केंद्रांपैकी एक मानले जाते. राज्यात ताडोब्यात वाघांची संख्या सर्वाधिक असून प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. येथे सुमारे २५ ते ३० बछडे आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा