• Sat. Jun 6th, 2026

    Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेले अन् तर्राट झाले; बंदिवानासोबत दारु पिणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल

    Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेले अन् तर्राट झाले; बंदिवानासोबत दारु पिणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल

    Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेलेल्या दोन पोलिसांना बंदिवानासोबत दारु पिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

    बुलढाणा पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: एका गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदिवानासोबत वैद्यकीय तपासणीला गेलेले ग्रेड पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार दारू पिऊन तर्राट झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बंदिवान आणि पोलिसांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जिल्हा कारागृहामध्ये असलेला स्थानबद्ध बंदी सचिन परशुराम माने व न्यायाधीन बंदी राहुल अर्जुन मोरे यांना कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ मे रोजी ११.४६ मिनिटांनी नेण्यात आले . त्यांना नेण्यासाठी पोलिस मुख्यालयातील ग्रेड पोलिस उपनिरीक्षक सुभाष शेळके व पोलिस हवालदार प्रकाश मोरे यांची नेमणूक करण्यात आली होती .

    Maharashtra TimesNagpur News : नागपूरच्या शंकरनगर चौकात भर उन्हात ड्रामा, तरुण रस्त्यावर झोपला, बघणाऱ्यांच्या नजरा खिळल्या, सर्वच चक्रावले
    उपचार घेऊन सायंकाळी पावणेपाच वाजता आरोपींना घेऊन पोलिस कारागृहात परतले. बंद्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गुटखा आढळून आला . दारूच्या नशेत असलेल्या आरोपी माने याने कारागृहाच्या मेन गेटमध्ये बसून कारागृह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान , पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंद्यासोबत दारू पिणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक सुभाष शेळके व पोलिस हवालदार प्रकाश मोरे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले .

    Maharashtra TimesRaigad Rain : झाडे उन्मळून पडले, विजेच्या तारा तुटल्या, रायगडमध्ये अवकाळी पावसाचे तांडव
    बंदिवानाने गेटवर आदळले डोके
    सचिन माने याची झडती घेत असताना त्याने नकार दिला आणि सर्कल विभागांमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला . तेथील कर्मचाऱ्यांनी त्यास गेटच्या बाहेर पकडले. परत आणण्याचा प्रयत्न केला असता , माने याने कारागृहाच्या गेटवर डोके आपटून स्वतःस जखमी करून घेतले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा