• Sat. Sep 5th, 2026
दिवसभरातील ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज पाहा एका क्लिकवर


Marathi News Live: नसरापूर येथील घटेनेने संपूर्ण राज्य हादरले असून, या निष्पाप बालिकेला श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी सायंकाळी धायरी येथील डीएसके विश्व परिसरात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान,मुंबईमध्ये कमाल तापमानाची सध्या चढती कमान असून शनिवारी या तापलेल्या पाऱ्यामुळे वैशाखाचे चटके नागरिकांना सहन करावे लागले. तापमानाची जाणीव प्रत्यक्ष तापमानापेक्षा तीव्र होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. याशिवाय, MMRDAने ऑरेंज गेट भूमिगत रस्ता प्रकल्पात महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत सुमारे 250 मीटर बोगद्याचे खोदकाम यशस्वी केले आहे. टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने केलेल्या या कामामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed