Maharashtra Weather: 10 मे 2026 रोजी, राज्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण राहणार असले तरी नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात उन्हाचा तडाखा आणि कोकणात आर्द्रतेमुळे उकाड्याची असह्य जाणीव झाली की, अंदमानच्या समुद्रात मान्सून आगमन कधी होणार याकडे लक्ष लागते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार, १४ ते २० मे या दरम्यान अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होऊ शकतो. मात्र ‘स्कायमेट’ ने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळून सरासरी तारखेच्या आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये नैर्ऋत्य दिशेने वाहणारे वारे १४ ते २० मे दरम्यानच्या आठवड्यामध्ये वाहू लागतील. तसेच बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे आणि अंदमानच्या समुद्रात तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर याच आठवड्यात मान्सून आगमन होईल, असाही अंदाज वर्तवला आहे. पण १२ आणि १३ मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ, बंगालच्या उपसागराच्या अतिदक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र दक्षिण श्रीलंका, कोमोरिन परिसर आणि मालदीव येथे सक्रिय असू शकेल.
या प्रणालीसोबत पूर्व-पश्चिम दिशेत एक लांबट द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आग्नेय अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशावर, तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांवर होईल. मान्सून साधारण २० मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात पोहोचतो. त्यानंतर २२ मेपर्यंत तो उत्तर अंदमान समुद्र, पोर्ट ब्लेअर आणि माया बंदर परिसर व्यापतो. मात्र यंदा १२ ते १३ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने बंगालच्या उपसागराच्या बाजूने विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल.
मुंबईमध्ये वैशाखचटके
मुंबईमध्ये कमाल तापमानाची सध्या चढती कमान असून शनिवारी या तापलेल्या पाऱ्यामुळे वैशाखाचे चटके नागरिकांना सहन करावे लागले. तापमानाची जाणीव प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तीव्र होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. शनिवारी मुंबईत तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा खूप चढा होता. राममंदिर येथे ३९ तर विक्रोळी येथे ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात तापमान ३९ अंशावर पोहोचले होते. तर, संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात वीज पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी सांताक्रूझ येथे ३५.६ तर
पालघर, कल्याण, डोंबिवलीत उष्णझळा
शनिवारी स्वयंचलित हवामान केंद्रांवर ४० अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पालघरमधील सुकसाळे येथे ४४.१ अंश, पलावा ४३.६, नेरळ ४३.५, अंबरनाथ ४३.४, कल्याण ४३.१, डोंबिवली ४२.८, नवी मुंबई परिसरातही ४० अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक होते. शनिवारी राममंदिर, विक्रोळी येथे कमाल तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले होते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा