• Mon. Jun 15th, 2026
    आईनंतर आत्याने मायेने सांभाळलं, बापाने तिच्याही कुटुंबाला संपवलं; बचावलेल्या ‘अबोल’ आकांक्षाची दहावीत चमकदार कामगिरी

    Nagpur Girl Student SSC Result : बालगृहातील कर्मचाऱ्यांनी तिला कुटुंबासारखे वाढवले, अभ्यासाचे नियोजन केले. आकांक्षानेही मनापासून अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रवीण लोणकर, नागपूर : तिच्या डोळ्यांदेखत वडिलांनी अख्खे कुटुंब संपविले. भावासह आत्या, आजी या सर्वांना रक्ताळलेल्या अवस्थेत तिने बघितले. हे बघून आकांक्षाच्या (नाव बदललेले) मनावर मानसिक आघात झाला. बोलकी आकांक्षा अबोल झाली. मात्र, या धक्क्यातून सावरत तिने दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळविले. ‘मला आयएएस बनायचे आहे’, असा मनोदय तिने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

    बालगृहातील आकांक्षाचे दहावीच्या परीक्षेत यश

    आपल्या मुलांचे आयुष्य चांगले घडावे यासाठी पालक अहोरात्र झटत असतात. मात्र, आकांक्षाच्या नशिबी असा आधारवड कुणीच नव्हता. वडिलांनीच आईचा खून केल्याच्या प्रकरणात ते कारागृहात शिक्षा भोगत होते. आत्याच्या घरीच ती राहत होती. आत्याने आईची कमतरता जाणवू दिली नाही. ती दुःखातून सावरली होती. सर्वकाही सुरळीत सुरू होते. आत्या, आजी, भावाचे प्रेम मिळत होते. मात्र, तिच्या आयुष्यात अचानक काळरात्र आली आणि उर्वरित नातेही क्षणात दूर झाले.
    Maharashtra TimesNida Khan : तुमच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचाय; पोलिसांचं नगरसेवकांना आमंत्रण, MIM च्या मतीन पटेलवर ‘बॉम्ब’, निदा खान फ्लॅटवर सापडली

    ‘त्या’ घटनेतून वाचलेली आकांक्षा

    कारागृहातून सुटलेल्या वडिलांनी रागाच्या भरात स्वतःची बहीण, भाऊजी, बहिणीची सासू, बहिणीचा मुलगा आणि स्वतःचा मुलगा यांना जिवे मारले. त्यावेळी आकांक्षा बाजूच्या खोलीत होती, त्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर आकांक्षाचा सांभाळ करण्यासाठी इतर नातेवाईकही पुढे आले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आणि बालकल्याण समितीच्या आदेशानुसार तिला नागपूर शहरातील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले.

    Suentra Pawar | ‘आई मुख्यमंत्री व्हावी, जय पवारांची इच्छा, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    बालगृहात कुटुंबासारखं वाढवलं

    पार्श्वभूमी माहिती असल्याने बालगृहातील कर्मचाऱ्यांनी तिला कुटुंबासारखे वाढविले. तिच्या अभ्यासाचे नियोजन केले. आकांक्षानेही मनापासून अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ६२ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. बालगृहाच्या अधीक्षिका कविता गेडाम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष छाया राऊत, जिल्हा परीविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनाने आकांक्षा पुढील आयुष्यात यशोशिखर गाठण्याचे स्वप्न बघत आहे.
    Maharashtra TimesMumbai Watermelon Death Case : अब्दुल्लांना मूत्रपिंड विकार, पत्नीला थायरॉईड; त्या रात्री त्रास सुरु होताच पहिला संपर्क कोणाला? चौकशीला सुरुवात

    १७ मुलांची बाजी

    आपले घर काय असते, याची जाणीवही नसणाऱ्या बालगृहातील १७ मुलांनी दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले. १२ मुली आणि पाच मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. प्रियदर्शिनी महिला वसतिगृहात राहणाऱ्या सरिताला (नाव बदलले) ८२ टक्के गुण प्राप्त झाले. कुटुंब नसतानाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या या मुलांचे यश नक्कीच खूप मोठे आहे, अशी भावना बालगृहातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा