Accident News: संभाजीनगरमध्ये एका अपघातात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला आहे. वडिलांसोबत दुचाकीवरून जाताना कंटेनरच्या धडकेत तिचा मृत्यू झाला असून वडिल गंभीर जखमी आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: एक दिवस आधीच परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन आनंदाने घरी परतलेल्या 17 वर्षीय तेजलवर नियतीने दुसऱ्याच दिवशी झडप घातली. नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना, भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत तेजल प्रधान हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.
तेजल काकासाहेब प्रधान वय 17 रा.आंबेलोहोळ ता. गंगापूर असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.काकासाहेब गिरजाबा प्रधान रा.आंबेलोहोळ ता. गंगापूर 46 हे गंभीर आहे.काकासाहेब हे आपली मुलगी तेजल हिला घेऊन दुचाकीवरून बगडी येथे नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. दुपारी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगाव शिवारात शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
Nida Khan : ‘निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा’, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
परीक्षेचा पेपर झाला अन् काळाने गाठलं
तेजल ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिने दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली होती. सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती. गुरुवारीच तिने प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर दिला होता. सुट्ट्या लागल्याचा आणि परीक्षा संपल्याचा आनंद साजरा करत असतानाच, 24 तासांच्या आतच तिचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तेजलला मृत घोषित केले. तिचे वडील काकासाहेब प्रधान यांना गंभीर दुखापत झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेजलच्या जाण्याने आंबेलोहोळ गावावर शोककळा पसरली आहे. 94 टक्के गुण मिळवणारी गावातील एक होतकरू मुलगी इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहत होती, मात्र एका बेजबाबदार कंटेनर चालकामुळे हे स्वप्न धुळीस मिळालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा