Pune Crime: मुंढवा परिसरातील केशवनगर येथे ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आफरीन सलीम पठाण (वय २९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची लहान बहीण, अरबिना सय्यद (वय २४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. खुडुसवाडा, चिंचघर, जि. पालघर) यांनी तक्रार दिली आहे.
Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन या ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करीत होत्या. महिला ग्राहकांकडून संपर्क आल्यानंतर त्या घरी जाऊन ब्यूटी पार्लरशी संबंधित सेवा देत होत्या. मंगळवारी (पाच मे) सायंकाळी त्या एका महिला ग्राहकाकडे कामासाठी गेल्या होत्या. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळील रस्त्यावर आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हा अपघाताचा प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.
Pune Crime: निर्दयी बाप! बायको माहेरी, मुलांना सांभाळणं झेपेना म्हणून भयंकर कृत्य; मुलीचा मृत्यू, सुदैवाने मुलगा बचावला
मात्र, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शवविच्छेदन अहवालात आफरीन यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, केशवनगर कचरा डेपोजवळील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक सागर गोडे तपास करीत आहेत.
