Nashik Crime : नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही शहरांच्या पोलिसांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन सुरक्षा आढावा’ सुरू केल्यावर अवघ्या काही तासांत निदा खान हिला ताब्यात घेण्यात आले.
बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडितेवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांत २६ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून निदा एजाज खान पसार होती. कंपनीतील विविध प्रकरणांत दाखल नऊ गुन्ह्यांत आठ संशयितांना अटक झाल्यानंतर निदाने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. २ मे रोजी न्यायालयाने जामीन फेटाळल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली.
संभाजीनगरला निदा लपल्याची माहिती
नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाला (एसआयटी) तातडीने निदाला ताब्यात घेण्याची सूचना केली. तांत्रिक विश्लेषणानुसार छत्रपती संभाजीनगरातल्या एका फ्लॅटमध्ये निदा लपल्याचे स्पष्ट झाले. आयुक्त कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना कळविल्यानंतर तेथील गुन्हे शाखेनेही गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू केली. दोन्ही शहरांच्या पोलिसांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन सुरक्षा आढावा’ सुरू केल्यावर अवघ्या काही तासांत निदाला ताब्यात घेण्यात आले.
Salil Ankola : पुण्यात राहत्या घरी आईची बॉडी सापडलेली, सलील अंकोला याला दीड वर्षांनीही सावरणं कठीण, डिप्रेशनमुळे पुनर्वसन केंद्रात
निदाच्या अटकेबाबत महत्त्वाचे मुद्दे
– संशयित मतीन याच्या मोबाइलवर एका क्रमांकावर संशयास्पद कॉल
– नियमित काही सेकंद बोलणे झाल्यावर संबंधित क्रमांक आठ-दहा तास बंद
– ‘त्या’ क्रमांकावरून निदा बोलत असल्याचे स्पष्ट; पोलिसांनी नारेगावातून केली अटक
– निदा तिच्या कुटुंबीयांसह नरेगावातील फ्लॅटमध्ये मुक्कामी; पती मात्र मुंब्रामध्ये
… असे फुटले बिंग
गुन्हा नोंद झाल्यापासून निदा खान मुंब्रामध्ये होती. तिच्या पतीचा एप्रिल महिन्यात ‘एसआयटी’ ने जबाब नोंदवला होता. पसार झालेल्या निदाबाबत ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी निदासोबत संवाद झाल्याचे वक्तव्य केले. तेथून तपासाची सुई ‘एमआयएम’ भोवती फिरली. छत्रपती संभाजीनगरातील ‘एमआयएम’चा नगरसेवक संशयित मतीन माजिद पटेल याने निदाला आश्रय दिल्याचे पोलिसांना समजले. मंगळवारी (दि. ५) ‘एसआयटी’ चे एसीपी संदीप मिटके यांनी नाशिकहून दोन पथके रवाना केली. अतिसंवेदनशील कारवाईमुळे अतिरिक्त मदत मिळण्यासाठी ‘बॅकअप प्लॅन’ सह पथके सज्ज होती. कोणालाही संशय नको म्हणून छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश नगरसेवकांना एकत्रित बोलवले.
Imtiyaz Jaleel | निदा खानची पाठराखण, शिरसाट, पडळकरांचे गंभीर आरोप, जलील काय म्हणाले?
पोलिसांचा वार, मतीन गपगार
सुरक्षेचा आढावा घेत असल्याचे सांगत बुधवारी (दि. ६) अनेकांशी पोलिसांनी चर्चा केली. खासगी सुरक्षारक्षक सोबत ठेवणारा मतीन हा असुरक्षिततेच्या भीतीपोटी पोलिसांच्या निमंत्रणानुसार तेथे पोहोचला होता. संशयित मतीनसमोर पोलिसांनी योग्य डाव टाकल्यावर निदाचा पत्ता सांगण्यावाचून कोणताही पर्याय त्याच्याकडे शिल्लक नव्हता. त्याने दिलेल्या महितीनुसार पुन्हा अंडरकव्हर पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये जात निदाला ताब्यात घेत तिला आश्रय दिल्यामुळे मतीनवर गुन्हा नोंदवला आहे.
Mumbai Watermelon Death Case : डोकाडियांच्या मृत्यूचं कारण काय? पोलीस नवीन तंत्र वापरणार, काय असतं मानसिक शवविच्छेदन? त्या रात्री सोबत जेवलेले नातेवाईकही रडारवर
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित निदा खान हिला नरेगावातून ताब्यात घेतले. तिला आश्रय दिलेल्या नगरसेवकालाही संशयित केले आहे. गुन्ह्यात सखोल तपासाचे आदेश दिले असून, सहभाग निष्पन्न होणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईल.
– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
