Pydhonie Watermelon Deaths Case : रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील चौघांना त्रास होऊ लागल्याने महिलेने पहिला कोणाशी संपर्क साधला, हे समोर आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणामध्ये जेजे रुग्णालय प्रशासनाने परीक्षण करण्याचा निर्णय घेतला असून फोरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा, जेजे रुग्णालयाचा हिस्टोपॅथालॉजी विभाग, मायक्रोबायोलॉजी विभागासह पोलिस सर्जन यांनी या प्रकरणी दिलेले वैद्यकीय निष्कर्ष आणि अहवालांचा एकत्रित अभ्यास करण्यात येणार आहे.
प्रत्येक पैलूचे वैद्यकीय विश्लेषण
पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चारही व्यक्तींना रुग्णालयामध्ये किती वाजता आणले, त्यात कोणाचा मृत्यू किती वाजता झाला, विषारी द्रव्यांचा किती अंश सापडला, शवविच्छेदनात कोणत्या बाबी दिसून आल्या, या प्रत्येक पैलूचे वैद्यकीय विश्लेषण करण्यात येणार आहे. Pune Nasrapur Case : चिमुरडीच्या घशात मोजा कोंबल्यामुळे श्वास अडला, पोस्टमार्टममध्ये स्पष्टता, भीमरावचा लैंगिक सक्षमता चाचणी अहवाल कोर्टात सादर
पतीला मूत्रपिंड विकार, पत्नीला थायरॉईड
शवविच्छेदन विभागातील वरिष्ठ तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हे मूत्रपिंडाच्या विकारासाठी काही आयुर्वेदिक औषधे घेत असण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्नीलाही थायरॉइडचा आजार होता. त्यांनी आर्थिक विवंचनेतून की आजारपणाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Rohit Pawar | ‘…तर त्यासाठी भाजपला रामराम करावा लागेल’, रोहित पवारांचा जय पवारांना सल्ला
रुग्णालयात दाखल का केले नाही?
रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील चौघांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या पत्नीने डॉक्टरांशी संपर्क साधला. विषबाधेची शक्यता असलेल्या प्रकरणांची न्यायवैद्यकीय कक्षामध्ये नोंद केली जाते. रुग्णालयामध्ये त्वरित दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. सर्वांत आधी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने हा सल्ला का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डॉक्टर कोणत्या पॅथीची प्रॅक्टिस करणारा होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. Nida Khan : तुमच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचाय; पोलिसांचं नगरसेवकांना आमंत्रण, MIM च्या मतीन पटेलवर ‘बॉम्ब’, निदा खान फ्लॅटवर सापडली
मानसिक शवविच्छेदनाचा आधार
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या, अपघात की हत्या होता, हे जेव्हा स्पष्ट होत नाही; तेव्हा तपास यंत्रणा ‘मानसिक शवविच्छेदन’ (सायकोलॉजिकल ऑटोप्सी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशिष्ट तंत्राचा अवलंब करतात. यालाच ‘मानसोपचारविषयक शवविच्छेदन’ किंवा ‘न्यायवैद्यक मानसिक शवविच्छेदन’ असेही संबोधले जाते. पारंपारिक शवविच्छेदनापेक्षा वेगळे असे हे तंत्र आहे. यात मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी नसून; त्या व्यक्तीच्या ‘मनाची आणि मानसिक स्थितीची’ केली जाणारी एक सखोल चौकशी मानले जाते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा