SSC Result 2026 Inspirtional Story Injured Student: दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर बाकी असताना सायकलला दुचाकीने धक्का दिल्याने हर्षदचा अपघात झाला होता.
हर्षल चौधरी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी. शिक्षणसाठी नाशिकमधील आपले काका किरण चौधरी यांच्याकडे राहणारा हा हर्षल ‘रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल’चा विद्यार्थी. दहावीच्या परीक्षेसाठी त्याचा ‘मविप्र’च्या जनता विद्यालयात नंबर आला होता. दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर बाकी असताना सायकलला दुचाकीने धक्का दिल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली.
Nida Khan : निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
ऑपरेशनशिवाय पर्याय नाही हे समजताच घरचे, शिक्षक यांनी त्याच्यासमोर जून-जुलै महिन्या पुरवणी परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला. परंतु, हर्षलने उर्वरित पेपर देण्याचा निर्णय घेतला. शाळेतील निवेदिता महाजन व सोनाली कारंडे या शिक्षिकांनी त्याच्या या निर्णयाला पाठिंबा देत परीक्षा केंद्राशी समन्वय साधला. दुसऱ्याच दिवशी विज्ञानाचा पेपर असल्याने ऑपरेशन करणे शक्य नव्हते. अशावेळी असह्य वेदना सहन करीत हर्षलने रुग्णवाहिकेतून हा पेपर दिला. त्यानंतर शस्त्रक्रिया करून रुग्णवाहिकेतूनच त्याने इतिहास व भूगोल हे पेपर दिले. मानव पाटील या विद्यार्थ्याने लेखनिक म्हणून काम केले. हर्षलला सीए व्हायचे आहे.
परीक्षेपूर्वी माझा अभ्यास पूर्ण होता. अचानक अपघात झाल्याने सगळे तणावात होते. पण, मला मात्र परीक्षा द्यायचीच होती. माझ्या पालकांपासून, शिक्षक, राज्य मंडळ परीक्षा केंद्र सर्वांनी माझी अडचण समजून मला सुविधा उपलब्ध करून दिल्या. – हर्षल चौधरी
Onion Price Drop: कांद्याचे भाव घसरले! क्विंटलला 50 रुपये दर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप
कर्णबधिर असूनही सर्वेश शाळेत प्रथम
कर्णबधिर असूनही सर्वेश तांडेलने स्वतःसाठी कोणताही सोपा मार्ग निवडला नाही. अभ्यासक्रम स्वतंत्र घेण्याऐवजी त्याने सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच विषयांची निवड केली आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविले. दहावीच्या परीक्षेत ६७टक्के गुण मिळवत सर्वेशने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता त्याला वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन करिअर घडवायचे आहे. संवादाच्या मर्यादा असल्या, तरी आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे सर्वेशने सिद्ध करून दाखवले आहे.
