• Sat. Jun 6th, 2026
    Nida Khan : ‘निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा’, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी

    निदा खान अटक प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाट याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : नाशिच्या आयटी कंपनीतील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील संशियत आरोपी निदा खान हिला मदत करण्याच्या प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा, अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. याबाबतची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत. “पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यामध्ये निदा खान हिची आई आणि मावशी आहे. ज्या रुममध्ये पकडलं गेलं ती रुम एका नगरसेवकाची आहे. रुम त्याच्या नावावर नाही. पण त्याच्या मालकीची आहे. इम्तियाज जलील यांचं नाव घेण्यामागचं कारण असं की, त्यांनी यापूर्वी नाशिकला जावून तिची पाठराखण केली होती. एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो तेव्हा त्याला लपवणं हा सुद्धा गुन्हा होता. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सहआरोपी केलं पाहिजे”, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

    संजय शिरसाट काय-काय म्हणाले?

    दरम्यान, संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आरोप केले आहेत. “मुंब्र्याचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी एमआयएमने या अशाप्रकारच्या गतीविधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणं हे सगळे प्रकार एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. म्हणून ही निदा खान म्हणून जी महिला आहे, ही एक छोटीशी मोहरा आहे. त्यांचं जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आपल्याला हे प्रकार अहिल्यानगर, पुण्यात पाहायला मिळतील. छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळतील. हे विष ज्या पद्धतीने पसरवलं जात आहे, हिंदूंचा द्वेष करणं, त्यांचा धर्मांतर करणे, या प्रकरणामुळे आता समाजामध्ये एक प्रकारचा राग आणि चीड निर्माण व्हायला लागली आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.”नाशिकचं प्रकरणही त्याच पद्धतीचं आहे. निदा खानला पकडलं गेलं आहे. आता तिच्याकडून अनेक माहिती समोर येणारच आहे. पण या प्रकरणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे, यातील मास्टरमाईंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

    “मला वाटते या प्रकरणाचे धागेदोर फार लांबवर गेले असावेत. जे वयात आलेले मुलं आहेत, ज्यांचा वयोगट 22 ते 30 च्या दरम्यान आहे, त्यांना अशाप्रकारे ट्रेंड करणं, हाती काम नाही, शिक्षण नाही, पण दीड लाखांचे मोटारसायकल आहे, आयफोन आहे, फिरायला त्यांच्याकडे पैसे आहेत. हे पैसे त्यांच्याकडे कुठून येतात? याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला आहे. बलात्कार, धर्मांतर, फसवणूक आणि नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यामुळे मी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सर्व जणांची चौकशी झाली पाहिजे. या चौकशीतून निश्चितच मोठे षडयंत्र पाहायला मिळेल”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला.

    इम्तियाज जलील यांच्याविरोधात पुरावे काय? शिरसाट म्हणाले…

    “नाशिक प्रकरणात पकडली गेलेल्या महिलेला उघडपणे पाठिंबा देणारे, तिच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतात, जाहीर भाषणात वक्तव्ये करतात, मुंब्र्याचं प्रकरण तसं झालं होतं. मुंब्र्यातील प्रकरणाला जातीवाताचा वास होता. म्हणून तुम्हाला या सगळ्यांची बाजू घेऊन नेमकं काय घडवायचं होतं, याबाबत तुमचा हेतू स्पष्ट होतो. म्हणून मी सांगितलं की, याची चौकशी झाली पाहिजे. आम्हाला शंका आहे. लोकांमध्ये चर्चाही आहे. नाशिकची महिला मुंबई, मालेगाव, ठाणे इथे जात नाही. ती छत्रपती संभाजीनगरलाच का येते? तिला जिथून अटक करण्यात आली तो नारेगाव परिसर कसा आहे? कुणाच्या लक्षातही येणार नाही की, ती महिला तिथे थांबली असेल. म्हणून हे सगळं करणाऱ्या, त्यामागचे मास्टरमाईंड निश्चितच संभाजीनगरमध्ये आहेत. संभाजीनगर हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल”, असं संजय शिरसाट म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा