• Wed. Sep 23rd, 2026

Satej Patil : गोकुळ वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेणार | सतेज पाटील

Satej Patil : गोकुळ वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेणार | सतेज पाटील

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहेत. गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत.न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठाने गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे निवडणुकीचा कायदेशीर मार्ग अधिकृतपणे स्पष्ट झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेमधील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. याआधी निवडणूक किमान सहा महिने पुढे ढकलण्यासाठी अनेक स्तरांवर चर्चा चालू होती; पण सर्वोच्च न्यायालयाने अधिकृतपणे 90 दिवसांचा कालावधी निश्चित केल्याने अशा अनियमित वाढीला अधिकृत अडथळा निर्माण झाला आहे. या निर्णयाबाबत आमदार सतेज पाटील काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed