• Wed. Jun 17th, 2026
    Vasai News: वसईतील वाहतूक कोंडीवर उपाय! शहरात चार नवे रेल्वे पूल उभारणार; कुठे असतील मार्ग?

    Vasai Rail Over Bridges: वसई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्या रेल्वे उड्डाणपुलांना गती मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन मार्गांची गरज वाढत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, वसई: वाढती आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या वाहतूककोंडी लक्षात घेता प्रस्तावित चार रेल्वे उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पांसंदर्भात लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांनी ‘एमएमआरडीए’ आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात उड्डाणपूल

    वसई-विरार शहरातील लोकसंख्या व वाहनसंख्या वाढत असताना, रस्त्यांची क्षमता मर्यादित राहिल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः वसई, नालासोपारा आणि विरार या रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याने उड्डाणपुलांची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने चार रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी ‘एमएमआरडीए’कडे सादर केला होता.Maharashtra TimesPune News: पुण्याचा प्रवास भुयारी मार्गांतून! शहरात पाच बोगद्यांना गती; कात्रज, येरवाडा, स्वारगेटला जोडणार

    या प्रस्तावात वसई-नायगावदरम्यान उमेळमान, नालासोपारा येथील अलकापुरी, विरारमधील विराटनगर आणि नालासोपारा-विरारदरम्यान ओस्वाल नगरी येथे उड्डाणपूल उभारण्याचा समावेश आहे. या प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौर अजीव पाटील, आमदार राजन नाईक, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी आदींनी ‘एमएमआरडीए’ आयुक्तांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यातील बैठकीनंतर मंगळवारी ‘एमएमआरडीए’चे अधिकारी चेतन भंडारे आणि सुरेंद्र शेवाळे यांनी संबंधित स्थळांना भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली.

    वाहतूककोंडीतून होणार सुटका

    या उड्डाणपुलांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास महापौर अजीव पाटील यांनी व्यक्त केला. या उड्डाणपुलांमुळे वसई-विरारमधील वाहतूककोंडी कमी होऊन पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभहोण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Highway Projects: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती! पुणे-सातारा, नागपूर-अमरावती, शिरूर-अहिल्यानगर… कसा होणार विकास?

    भुयारी गटार योजना १८ वर्षांनंतरही अपूर्ण

    मिरा-भाईंदरमधील भुयारी गटार योजनेचे काम १८ वर्षांनंतरही पूर्ण झालेले नसल्याची बाब महासभेत उघड झाली. आतापर्यंत केवळ सुमारे १८०० मलनिस्सारण जोडण्या करण्यात आल्याचे प्रशासनाच्या स्पष्टीकरणातून समोर आले असून, अनेक भागांत कामालाच सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नागरिकांकडून सुमारे १५०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महासभेत काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी उपस्थित केलेल्या श्नावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती पुढे आली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा