• Wed. Sep 23rd, 2026
शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या अलाइनमेंटच्या फेरविचाराची आमदार नरकेंची मागणी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या अलाईनमेंटला कोल्हापुरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. कोल्हापुरातील करवीर मतदार संघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी केली आहे. आमदार नरके यांनी 28 एप्रिल रोजी मुंबईत शिंदेंची भेट घेऊन निवेदन सादर केले. सध्या राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर मार्ग नको, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. महामार्गामुळे जलस्रोतांमध्ये अडथळे आणि पुराचा धोका वाढण्याची चिंता आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed