अभिजीत दराडे, पुणे : राज्यात सध्या दुष्काळाचे गडद सावट पसरले असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली असली, तरी आता परतीचा पाऊस तरी दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या सुरू झालेला परतीचा पाऊस हा सार्वत्रिक नसून केवळ स्थानिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे या पावसाने राज्यातील दुष्काळाचे संकट टळणार नसून खरीप पिकांनाही फारसा दिलासा मिळणार नाही, असा स्पष्ट अंदाज हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे तीव्र क्षेत्र म्हणजेच ‘डिप्रेशन’ तयार झाले असून, त्याची वाटचाल उत्तर-पश्चिम दिशेने सुरू आहे. त्यामुळे या प्रणालीचा मुख्य प्रभाव ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांवर अधिक राहणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र, ही संपूर्ण यंत्रणा महाराष्ट्रावरून जाणार नसल्याने राज्यभरात सार्वत्रिक व दमदार पावसाची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण थोडे वाढू शकते; परंतु हा पाऊस खरिपाच्या पिकांना जीवदान देणारा ठरणार नाही. या पावसामुळे केवळ जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि काही प्रमाणात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, मात्र धरणांमधील पाणीसाठ्यात किंवा जलस्रोतांमध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे नाहीत.
दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांविषयी बोलताना सानप यांनी स्पष्ट केले की, हवामान विभागाकडील पावसाची सर्व आकडेवारी सार्वजनिक आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाची तूट हा महत्त्वाचा निकष मानला जातो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची तूट ३० टक्क्यांहून अधिक आहे, तर ज्या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तेथे दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो. केवळ पावसाची तूटच नव्हे, तर ‘स्टँडर्डाइज्ड प्रेसिपिटेशन इंडेक्स’, वनस्पतींची स्थिती दर्शवणारे निर्देशांक, जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळी अशा अनेक शास्त्रीय घटकांचा अभ्यास केला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय कृषी विभागाच्या निकषांनुसार राज्य सरकारची समिती अंतिम अहवाल तयार करते आणि त्यानंतरच दुष्काळ घोषित होतो.
सध्याच्या आकडेवारीनुसार मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा तसेच छत्रपती संभाजीनगरचे काही तालुके वगळता संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्हे आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची तूट अत्यंत मोठी असून दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा