Maharashtra Politics : दादरमधील पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत महापालिका सभागृहातील समन्वयावरून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नगरसेवकांची कानउघाडणी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वडाळा येथील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्प मंजुरीसाठी मुंबई महापालिका सभागृहात घेतलेल्या मतदानावेळी भाजप-शिवसेना सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कमी पडले आणि हा प्रस्ताव बाजूला ठेवण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली. त्यामुळे मंगळवारी दादरमधील पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत महापालिका सभागृहातील समन्वयावरून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नगरसेवकांची कानउघाडणी केली.
मुंबई महापालिका सभागृहात बैठक
या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच आमदार उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंबई महापालिका सभागृहातील विविध मुद्दे आणि समन्वयावरही या बैठकीत चर्चा झाली. Election Results : प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व संपुष्टात, भाजपचा ऐतिहासिक विजय; 2029 च्या लोकसभा निवडणुकीत कल कायम राहण्याचे अंदाज
भाजप नेत्यांचा नगरसेवकांना सल्ला
महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता असल्यामुळे समन्वय महत्त्वाचा असतो. भाजपमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती व अन्य महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष, मित्रपक्ष शिवसेनेच्या गटनेत्यांशी समन्वय असायला हवा. सभागृहातील कामकाजाबाबत महापौर, सभागृहनेता व स्थायी समिती अध्यक्ष यांनी एकत्र बसून रणनीती आखली पाहिजे, असा सल्ला भाजप नेत्यांनी नगरसेवकांना दिला.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करण्याची गरज | श्याम मानव
बरीच वर्षे सत्तेत राहिल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाला पालिकेच्या अनेक बाजू, कायदे माहीत असल्याने त्यांना वेळीच रोखण्याच्याही सूचना वरिष्ठांकडून उपस्थित ज्येष्ठ नगरसेवकांना करण्यात आल्या. महापालिका सभागृहात अथवा समितीमध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल अथवा एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर कोणती काळजी घ्यावी, याबाबतही काही सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे ‘बारा’ वाजले! आता ’12 तास काम, 24 तास आराम’ संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी
अनुपस्थित नगरसेवकांना खडसावले
वडाळा येथील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भाजपचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात अनुपस्थित राहिले. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांकडून अनुपस्थित नगरसेवकांना पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी खडसावण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा