• Sun. Jun 14th, 2026
    पावसाच्या हजेरीमुळे दिलासा! विदर्भात पारा घसरला; येत्या चार दिवसांत हवामान बदलणार

    Weather Update: विदर्भातील काही ठिकाणी बुधवारी पाऊस पडल्यामुळे तापमानाचा पारा घसरा होता. त्यामुळे नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विदर्भात उष्णतेचा तडाखा काहीसा कमी झाला असून कमाल तापमानात घसरण नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर काही भागांत हलक्या पावसाची हजेरी लागल्याने वातावरणात दिलासा निर्माण झाला आहे. बुधवारी बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानात १ ते ३ अंशांनी घट झाली.

    कोणत्या भागांत किती होते तापमान?

    अकोला येथे कमाल तापमान ४२.१ अंशांवरून किंचित घसरले, तर अमरावतीत ४१.२ अंश नोंदवले गेले. वाशीम येथे सर्वाधिक ४२.६ अंश तापमान असले तरी तेही सरासरीपेक्षा जास्त वाढलेले नाही. नागपूरमध्ये कमाल तापमान ३९.६ अंशांवर आले असून उष्णतेची तीव्रता कमी झाल्याचे जाणवले. किमान तापमानातही काही प्रमाणात चढउतार दिसून आला. गोंदिया येथे किमान तापमान २०.४ अंशांपर्यंत खाली आले; तर ब्रह्मपुरीत ते २२.४ अंश नोंदवले गेले. दरम्यान, भंडारा येथे २ मिमी, गोंदिया येथे १ मिमी तर ब्रह्मपुरीत ०.८ मिमी पावसाची नोंद झाली. इतर शहरांत मात्र पावसाचा प्रभाव कमी राहिला.Maharashtra TimesHeat Stroke: राज्यात उष्णतेची तीव्र लाट! तीन महिन्यांत उष्माघाताचे 163 रुग्ण; 3 संशयितांचा मृत्यू, अहवालानंतर कारण होणार स्पष्ट

    तरीही ढगाळ वातावरण आणि वाऱ्याच्या वेगामुळे उकाड्यात काहीशी घट झाली आहे. पावसाच्या सरींमुळे काही भागांत गारवा निर्माण झाला. गुरुवारपासून पुढील काही दिवस शहर व विदर्भात ढगाळ वातावरण राहील. मात्र, तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

    गुरूवारी कसं असेल तापमान?

    7 मे रोजी, गुरूवारी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या 4 दिवसांसाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे मे महिन्यात तापमान वाढणार आहे. दरम्यान, मुंबई आणि ठाणे शहराला हवमान विभागाने उष्ण आणि दमट वातावरणासाठी यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, रत्नागिरीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार.

    Maharashtra TimesMumbai Monorail: मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! ‘मोनोरेल’ची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित; लवकरच पूर्ववत होणार सेवा

    महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बुधवारपासून बदलले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. येथेही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा