Pune Parvati Case : नसरापूर प्रकरणानंतर शहरातील पर्वती भागातही असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
पुणे पर्वती नातीवर आजोबांकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये झालेल्या संतापजनक घटनेला काही दिवसही उलटत नाही, तोवर शहरातील पर्वती भागात घडलेल्या धक्कादायक प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. आई-वडील कामावर जाणारे, घरात एकटी राहणारी चिमुकली मुलगी आणि याचाच गैरफायदा घेत स्वत:च्याच नराधम आजोबाने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपी आजोबाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. याचदरम्यान, पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
चिमुरडीने सांगितला घडलेला प्रकार
घटनेच्या दिवशी आई नेहमीप्रमाणे कपड्यांच्या दुकानात कामाला गेली होती, तर वडील रिक्षा चालवण्यासाठी बाहेर होते. संध्याकाळी घरात मुलगी एकटीच होती. रात्री साधारण 9 वाजता आई घरी आली, तेव्हा मुलगी खूप घाबरलेली दिसली. रडत-रडत तिने आईला सांगितलं, ‘तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून नेत होते. माझे कपडे काढले. अंगावर नखं मारली’, हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने सांगितलं की, ‘मुलीच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा होत्या आणि ती पूर्ण घाबरलेली होती. तेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला. Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघ निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, आदेशात काय म्हटलंय?
याआधीही घडला होता असा प्रसंग
धक्कादायक म्हणजे, मुलीने यापूर्वीही असाच प्रकार झाल्याचं सांगितलं. ‘आधी पण तात्या असंच करत होते. पण मी पळून जायचे’, असं चिमुरडीने तिच्या आई-वडिलांना बोलताना सांगितलं, आणि भीतीमुळे ती आतापर्यंत काहीच बोलली नव्हती. वडिलांनी सांगितलं की, ‘मी रिक्षाचालक आहे. त्यावेळी मी बाहेर होतो. वर्षभरापूर्वीही आरोपीने घरातून मोबाईल चोरी केला म्हणून मी त्याला घरातून हाकललं होतं. तो जवळच राहत होता, हे आम्हाला माहीत नव्हतं.’ आरोपीने मुलीला खाऊ देऊन तिचा विश्वास जिंकला आणि घरात कोणी नसताना हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Sinhagad Fort Accident : सूर्यास्त बघून फोटो काढण्यासाठी गेला, 150 फूट खोल दरीत कोसळला; पुण्यातील पर्यटकाचा एका कॉलने जीव वाचला; थरारक Video
फाशी झालीच पाहिजे
या घटनेनंतर आई-वडिलांचा संताप अनावर झाला आहे. ‘माझ्या मुलीच्या अंगाला हात लावणाऱ्याला सोडू नका. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,’ अशी त्यांची ठाम मागणी आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बालसुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. घरात ओळखीच्यांकडूनच धोका निर्माण होत असेल, तर मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा