• Tue. Jun 16th, 2026
    Sinhagad Fort Accident : सूर्यास्त बघून फोटो काढण्यासाठी गेला, 150 फूट खोल दरीत कोसळला; पुण्यातील पर्यटकाचा एका कॉलने जीव वाचला; थरारक Video

    Pune Sinhagad Fort Accidnet News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक मोठी घटना समोर आली आहे. किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा फोटो काढताना तोल गेला अन् तो 150 ते 170 फुट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

    पर्यटक सिंहगड किल्ल्यावरुन कोसळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : फोटो आणि सोशल मीडियाच्या लोक एवढे आहारी गेले आहेत की, स्वतःच्या जीवाची देखील त्यांना परवा राहिलेली नाही. आपण अनेकवेळा ऐकतो की, सेल्फी, फोटो तसेच व्हिडिओ काढण्यासाठी नागरिक स्वतःचा जीव गमावतात. क्षणाच्या सुखासाठी जीवाला धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक मोठी घटना काल मंगळवारी पुण्यातील सिंहगडावर घडली.

    हवा पॉईंट परिसरात गेला, अन्…

    पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकावर जीवघेणा प्रसंग ओढावला. शिरूर येथील योगेश मोहन शितोळे (वय 35) असं त्यांचं नाव आहे. काल सकाळी किल्ला फिरण्यासाठी योगेश हे आले होते. दिवसभर फिरून झाल्यानंतर संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ते सूर्यास्ताचे फोटो काढण्यासाठी किल्ल्याच्या पश्चिमेकडील हवा पॉईंट परिसरात गेले. सूर्य मावळतीकडे जात असताना सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्याच्या नादात ते दरीच्या कडेला उभे होते. मात्र, ते फोटो काढायला गेले असता गवतावरून अचानक त्यांचा पाय घसरला आणि क्षणात त्यांचा तोल गेला. योगेश शितोळे थेट 150 ते 170 फूट खोल दरीत खाली कोसळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. खोल दरीत कोसळल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली.

    Maharashtra TimesPune Nasrapur Case : अख्खं गाव गाढ झोपेत, जिथे कृत्य केलं ‘त्या’ गोठ्यात पोलिसांनी नराधम कांबळेला नेलं; अन्…; VIDEO

    112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल

    दरम्यान, सुमारे दोन ते अडीच तास दरीत अडकलेल्या अवस्थेत ते बेशुद्ध होते. संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मोठ्या धैर्याने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदतीची विनंती केली. त्यांचा हा एक फोनच त्यांच्या जीवासाठी आधार ठरला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी अनिकेत काळे यांनी तत्काळ हालचाली करत आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला कळवलं. काही वेळातच रेस्क्यू टीम आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंधार पडत असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली.
    Maharashtra TimesMumbai Local Accident: लोकलखाली दिसले माणसाचे पाय, प्रवाशांची व्हिडिओ काढण्यासाठी धडपड; भाईंदर रेल्वे स्थानकावर दुपारी खळबळ

    150 फूट खोल दरीत रेस्क्यू

    कठीण परिस्थितीत जवळपास 150 फूट खोल दरीत उतरून रेस्क्यू टीमने योगेश शितोळे यांना शोधून काढलं आणि सुरक्षितपणे वर आणलं. या थरारक बचाव मोहिमेत तानाजी भोसले, संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, नाना जरंडे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ, वैभव भोसले यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिकेत काळे व प्रवीण तेलवाडे यांनी मोलाची भूमिका बजावली. यानंतर शितोळे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा