• Fri. Jun 5th, 2026
    Bacchu Kadu: पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना नेते बच्चू कडू यांची सरकारकडं मागणी

    Bacchu Kadu On Farmer Loan Waiver GR: कर्जमाफीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार असून, सरकारने या विषयाकडे उदारतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

    बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीआर निघाला नसल्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात जीआर काढावा अशी अपेक्षा शिवसेनेचे मनोनित आमदार बच्चू कडू यांनी केली.

    कडू मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल विचारले असता कडू यांनी, विधानसभेत कर्जमाफीची घोषणा झाल्याने सरकारला आता त्यापासून माघार घेता येणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत जाहीर केलेला ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी अपुरा असल्याचे सांगत तो वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एखाद्या शेतकऱ्याकडे दीड लाख रुपयांचे कर्ज असेल आणि तो एक लाखाची परतफेड करत असेल, तर त्याला अधिक प्रोत्साहन निधी मिळायला हवा, असे ते म्हणाले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.

    Maharashtra TimesCensus In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती
    सर्वांनाच कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही; मात्र, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. एखाद्याकडे चार लाखांचे कर्ज असल्यास किमान २ लाख रुपये माफ करावेत, असे ते म्हणाले. हमीभावाचा प्रश्न सोडवण्यासाठी पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अपंगांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत जिल्हा व तालुका स्तरावर अपंग अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.

    Maharashtra TimesNagpur News : मला समाजासाठी काम करायचं आहे! दृष्टिहीन आदित्यची 12वीत 84 टक्क्यांसह गगनभरारी, अधिकारी होण्याचा निर्धार
    यावेळी संभाजीनगरमधील अपंग महिलेच्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत कडू यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासनातील मानवता संपल्याचे हे गंभीर उदाहरण आहे, असे ते म्हणाले. संबंधित महिलेच्या निवासाची तत्काळ योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा