Nashik TCS Case: निदा ही कंपनीत ‘ट्रेनी ग्रेड ऑफिसर’ म्हणून कार्यरत होती. तिने पीडितेचे ‘ब्रेनवॉशिंग’ करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीच्या टप्प्यावर असून, संशयितेला जामीन दिल्यास ती इतर साक्षीदारांवर दबाव टाकू शकते.
देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल अत्याचार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याबाबत संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्यापैकी दानिश व तौसिफ पोलिस कोठडीत असून, निदा २७ मार्चपासून पसार आहे.
Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संताप
गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने निदाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यासह निदाचा मोबाइल जप्त करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, तर पीडितेने केवळ एका व्यक्तीसोबतच्या प्रेमसंबंधातून आणि राजकीय हेतूने ही खोटी तक्रार केली आहे. संशयित तीन महिन्यांची गर्भवती असून, अटकेमुळे तिच्या अपत्याचे नुकसान होईल. यासह धर्मांतर किंवा जातीवाचक अपमान झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा निदाच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.
दरम्यान, कंपनीत तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नात संशयितांनी वारंवार हॉटेलांत नेत तेथे मांसाहार करण्याची बळजबरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) हे चौघे २९ एप्रिलपासून पोलिस कोठडीत आहेत. त्यांना आज, मंगळवारी (दि. ५) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Nashik MHADA Scam: ‘म्हाडा’त बनावट नकाशांद्वारे मंजुरी; नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
-तपासातील मुद्दे…
-पीडितेकडील ‘बुरखा’ पोलिसांनी जप्त केला
-निदाने पीडितेच्या मोबाइलमध्ये ‘इस्लामिक रिलिजिअस अॅप्लिकेशन’ इन्स्टॉल केले होते
-दानिशने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केला
-दानिशने पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली; जेणेकरून त्याला तिचे नाव बदलणे शक्य होईल
-तौसिफने पीडितेला कामाच्या ठिकाणी धमकावून लैंगिक सुखाची मागणी केली
-पीडितेने नाव बदलून ‘हनिया’ असे करण्यात येणार होते
-पीडितेला मलेशियातील ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा कट होता
-मलेशिया ‘कनेक्शन’ मध्ये परकीय आर्थिक रसद आहे का याचा शोध सुरू
Shashikant Shinde: गटबाजी रोखणार! शशिकांत शिंदेंचा सज्जड दम; व्यक्तिकेंद्रित पक्ष न ठेवण्याचाही दिला सल्ला
न्यायालयाचे निरीक्षण…
-हा केवळ वैयक्तिक वाद नसून, हे एका संघटित कटाचे स्वरूप आहे, ज्याचे धागेदोरे अनेक थरांवर पसरलेले आहेत
-परकीय निधी, आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आणि मालेगाव कनेक्शनचा तपास करण्यासाठी संशयितेची कोठडीत चौकशी आवश्यक आहे
-कायद्यासमोर सामान्य व्यक्ती आणि गर्भवती महिला यांच्यात गुन्ह्याच्या तपासाच्या बाबतीत फरक होऊ शकत नाही
-संशयित उच्च शिक्षित असून, प्रतिष्ठित कंपनीत कामाला होती. तरीही तिने पदाचा वापर पीडितेवर दबाव टाकण्यासाठी केल्याचे प्रथमदर्शनी दिसते
