Pune-Hubballi Vande Bharat Express: गेल्याच आठवड्यात पुण्यात ‘मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस’चा डबा रुळावरून घसरल्यानंतर सोमवारी पुन्हा एक तांत्रिक बिघाड झाला आहे. पुणे-हुबळी वंदे भारतयामुळे दोन तास जागेवरच उभी होती
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याहून हुबळीला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या ‘पॅन्टोग्राफ’मध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी दुपारी नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे ही एक्स्प्रेस दोन तास जागेवरच उभी होती. गेल्या आठवड्यातच पुणे रेल्वे स्थानकावर ‘मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस’चा डबा रुळावरून घसरल्यानंतर पुण्यातून जाणाऱ्या वंदे भारतमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.
प्रवाशांची गैरसोय
पुण्याहून हुबळीला जाणारी वंदे भारत सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता पुणे स्थानकावरून रवाना झाली. नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे एक्स्प्रेसला होणारा विद्युतप्रवाह खंडित झाला. त्यामुळे ही रेल्वे जागेवरच थांबून राहिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या विद्युत विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी तातडीने पॅन्टोग्राफची तपासणी सुरू केली. त्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. ही गाडी रुळावर थांबल्याने पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या गाडीला एक तास उशीर झाला.Vande Bharat Mumbai: मुंबईला येताना खाऊ घेण्यासाठी वडील वंदे भारतमधून उतरले, चिमुकली आतच अन् तेवढ्यात ट्रेन सुटली; नंतर काय घडलं?
पुण्यातून थेट हुबळीला जाण्यासाठी या एक्स्प्रेस गाडीचा फायदा प्रवाशांना होत आहे. त्यामुळे तिकीट जास्त असले, तरी ही गाडी कायम फुल असते. सध्या उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी वातानुकूलित गाड्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वंदे भारतला चांगलीच गर्दी असते; परंतु सोमवारी ‘ पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप आला सामोरे जावे लागले.
Pune Accident : भरधाव कंटेनरची पिकअपला जोरदार धडक, वाहनाचा चेंदामेंदा, चालक आतमध्येच अडकला; पुण्यात महादेवचा करुण अंत
अधिकाऱ्यांमार्फत चौकशी
‘मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस’चा एक डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला होता. वंदे भारत रुळावरून घसरल्याची देशातील ही पहिली घटना होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दर्जाच्या (जे ग्रेड) अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मुख्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चौकशीत आढळलेल्या त्रुटी व संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारीही ‘वंदे भारत’ला वीजपुरवठा खंडित झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा