Mumbai Tourists Attacked in Ratnagiri Aare Ware : कोकणातील रत्नागिरीत पर्यटनासाठी मुंबईहून गेलेल्या व्यापारी कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरी पर्यटकांवर हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी शहराजवळ फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी शहराजवळ आरे-वारे परिसरात हा सगळा संतापजनक प्रकार घडला आहे. मुंबई येथील पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबासोबत हा सगळा प्रकार शनिवारी 2 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडला आहे. प्रविण हरीश्चंद्र कोरे (वय 48, रा. दहिसर पश्चिम, मुंबई) हे आपल्या कुटुंबासह रत्नागिरी येथे पर्यटनासाठी आले होते. या सगळ्या गंभीर प्रकाराची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मुंबई येथील एक व्यावसायिक कुटुंब रत्नागिरी परिसरात पर्यटनासाठी गेलेलं होतं. कुटुंबातील सदस्य रत्नागिरी शहराजवळील आरे-वारे परिसरात फिरण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चार अनोळखी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 2 मे रोजी सायंकाळी घडली. प्रविण हरीश्चंद्र कोरे हे आपल्या कुटुंबासह रत्नागिरी येथे पर्यटनासाठी आले होते. आरे-वारे येथे असताना चार अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनासमोर गाडी चालवत अडथळा निर्माण केला. त्यानंतर त्यांनी कोरे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी प्रविण कोरे यांना मारहाण करत त्यांच्या डोक्याला, कानाला व हाताला दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नी स्नेहल यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचवेळी एका आरोपीने धारदार शस्त्र काढून मारण्यासाठी धाव घेतल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या झटापटीत कोरे यांचे भाऊ गिरीष यांच्या हाताला दुखापत झाली असून पुतण्या सार्थक यालाही मार लागला आहे. Indorikar Maharaj: लेकीचं लग्न मोठं का केलं? लग्नात मठ्ठा, गुलाबजाम ठेवला की नाही? स्वत: इंदोरीकर महाराजांनीच सर्व हिशोब मांडला!
‘तुमच्या गाडीचा नंबर आम्ही बघितला आहे’
या झटापटीत पर्यटक यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व त्यामध्ये असलेली नऊ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी कुठेतरी पडून नुकसान झालेलं आहे. त्यानंतर काहीवेळ त्या अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ते तिथून निघून जाताना ‘तुमच्या गाडीचा नंबर आम्ही बघितला आहे. तुम्हाला शोधून आम्ही ठार मारतो’ अशी धमकीही दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. Mumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास दरम्यान, मारहाण करणाऱ्या संशयीत आरोपींचे गाडी क्रमांक पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेनंतर कोरे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलीस या धक्कादायख घटनेचा सखोल तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा