Kharegaon Toll Naka: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथील टोलवसुली पुन्हा सुरू होणार आहे. हा पट्टा मुंबईला नाशिक आणि आमनेशी जोडतो. आमने येथे लवकरच ठाण्यापर्यंत उन्न मार्गाचं काम सुरू होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा माजिवडा – वडपे मार्गाची सर्व प्रलंबित कामे पावसाळ्याआधी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असल्याने त्यावर आता खारेगाव येथे पुन्हा एकदा टोलनाका उभारत टोलवसुलीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. हा टोलनाका सुरू असल्यास ठाणे जिल्ह्यामधील हजारो वाहनांना भुर्दंड बसण्याची भीती व्यक्त होत असून या विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या टोलनाक्यावरून पुन्हा राजकीय आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
सन १९९८मध्ये खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. या टोलवसुलीविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. मे, २०१७मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला. या रस्त्याच्या उभारणीचा आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचे आयआरबी कंपनीने स्पष्ट केल्यानंतर तत्कालीन सरकारने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक आणि उरण जेएनपीए येथील हजारो वाहनचालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. ही वसुली बंद होऊन नऊ वर्षे पूर्ण होत असतानाच आता नवा माजिवडा-वडपे प्रकल्प पूर्ण होताच टोलवसुली केली जाणार आहे. त्यासाठी खारेगाव येथे टोल चौक्यांचे कामही प्रगतिपथावर आहे. या वसुलीची कुणकुण लागताच राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व मनसेने या प्रखर विरोध केला आहे.
Thane News: मुंबई, ठाणे ते समृद्धी महामार्ग वेगवान प्रवास शक्य! 21 किमी लांब उन्नत मार्गामुळे प्रवाशांना फायदा; कुठे असेल मार्ग?
ठाणेकरांना टोलमुक्ती द्या
वाहन खरेदी करतानाच रोडटॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही तर प्रवास खर्च वाढल्याने व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढविले जाणार आहेत. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली, त्याच धर्तीवर या टोलनाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी, अन्यथा टोलनाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला.
Thane Traffic : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडी पुलाची कोंडी फुटली, ‘माजिवडा ते वडपे’ रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती
जन आंदोलनाचा इशारा : मनसे
प्रामुख्याने मनसेने हा टोलनाका बंद करण्यासाठी याआधी आंदोलन केले होते. त्यानंतरच हा टोल बंद झाला होता. या मार्गावर आधीच पडघा येथे टोलवसुली केली जाते. भविष्यात घोडबंदर रोड येथेही अशा पद्धतीने टोलवसुली सुरू केली जाईल. सरकारने या मुद्द्यांप्रश्नी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता पाहू नये. अन्यथा जन आंदोलनाचा भडका उडेल, असे मत मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा