Bhor Crime News: पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल म्हणाले, ‘हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, सखोल तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. यात सहा अधिकारी आहेत. या तपासात आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण; तसेच लैंगिक सक्षमतेची चाचणी केली जाणार आहे.’
भोर हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यात दोन महिला अधिकारी आहेत. दरम्यान, आरोपीची कोठडी मिळवल्यानंतर पोलिसांनी रविवारी ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली. नसरापूर येथील घटनास्थळ ‘सील’ करण्यात आले असून, अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले होते. नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले; तसेच शनिवारी (२ एप्रिल) बंद पाळत निषेध नोंदवला. या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार आणि ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी पाच मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान,मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेऊन, एकाही राजकीय पुढाऱ्याने सांत्वनासाठी घरी येऊ नये, अशी स्पष्ट विनंती केली आहे. ‘जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्याने आमच्या घरी येऊ नये. आरोपीला फाशी झाल्यानंतर आम्ही राजकारण्यांना भेटू,’ असे पीडितेच्या वडिलांनी नमूद केले.
भोर, नसरापूरला कडकडीत बंद
घृणास्पद कृत्याच्या निषेधार्थ रविवारी भोर व राजगडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नसरापूर येथे सलग तीन दिवस कडकडीत बंद पाळून नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. भोर तालुका किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी ‘बंद’चे आवाहन केले. त्यानुसार हॉटेले, कापड इतर व्यवसायिक आदी ४०० दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. राजगड तालुक्यातील सर्व व्यवहारही रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. मुख्य बाजारपेठेमधील सर्व दुकाने दिवसभर बंद राहिली.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका येथे टायर जाळून आंदोलन करण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण ओहाळ आणि नागरिकांनी ‘नराधमाला फाशी द्या,’ अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नसरापूरजवळील कापूरव्होळ ग्रामस्थांनी गावदेवीचा उत्सव रविवारी साजर न करता कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रविवारी नसरापूर येथे पीडितेच्या आजी- आजोबांची भेट घेतली. ‘या प्रकरणी जलदगती न्यायालयात दररोज सुनावणीचे आदेश द्यावेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंतचे निकाल एक महिन्यात लावावेत,’ अशी मागणी त्यांनी केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा