Pune Nasrapur Case : पुरावे आहेत, आरोपीही समोर आहे, मग शिक्षेला उशीर का?; गुन्हेगाराला ‘शिवशाही’प्रमाणे शासन व्हावे; नसरापूर घटनेवर भगरे गुरुजींची प्रतिक्रिया
Pune Crime : विविध स्तरातून पुण्यातील नसरापूरमधील घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. चिमुकलीसोबत झालेल्या भयानक प्रकरानंतर सबंध राज्यात संताप पसरला आहे, अतुल भगरे गुरुजींनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया देत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी यावेळी शिवकालीन काळाचा दाखला दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातल्या भोरमधील नसरापूरमधील चिमुकलीसोबत झालेल्या अमानवीय कृत्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. विविध स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. काल दिवसभर हे प्रकरण देशभर चर्चेत राहिल. आजही याप्रकरणी मोठ्या घडामोडी घडत आहेत. नसरापूरमधील एका चिमुकलीचा ज्या क्रूर पद्धतीने जीव घेतला आहे. त्या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. या प्रकरणावर आता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.या प्रकणातल्या पीडितेला शिवशाही सारखा तात्काळ न्याय मिळावा, नराधमाला शिवशाही प्रमाणे शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया भगरे गुरुजींनी माध्यमांशी बोलतान दिली आहे.
“शिवशाही प्रमाणे न्याय अपेक्षित”
भारतातल्या कायद्यामध्ये आरोपीला अटक होते. त्यानंतर त्याच्या खटल्यात वारंवार तारंखावर तारखा पडतातस असे म्हणत भगरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, जेंव्हा आरोपी समोर आहे. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावेदेखील उपलब्ध आहेत. तर निकालासाठी मात्र महिनोनमहिने का जावेत. शिवशाही काळात ज्याप्रकारचे शासन हे गुन्हेगाराला मिळायचे तेच आता याही काळात तशाच पद्धतीचा न्याय अशा प्रकरणांमध्ये अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.
“पालकांमध्ये चिंतेचं वातावरण”
पुढे बोलचाना भगरे गुरुजी म्हणाले की, आज या घटनेमुळे पालकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेचा घटनाक्रम पाहून मन सुन्न होते. ज्यापद्धताीने मुलीबरोबर घटना घडली आहे. तिचे तुकडे करण्यात आले आहे, त्यामुळे आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळायला पाठवावे की नाही, हा प्रश्न आता पालकांना पडतो आहे.
Pune Nasrapur Case: अशा नराधमांना भर चौकात…; फडणवीसांनी लोकभावना मांडली, पण नंतर कायद्याची चौकट सांगितली!
“फाशीचीच शिक्षा व्हावी”
या घटनेतल्या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने आता कठोर पावले उचलावीत अशी विनंती भगरेंनी सरकारला केली आहे. अशा घटना , गुन्हा करण्यापूर्वी कोणाचेही हात थरथरले पाहिजेत, अशी मागणी यावेळी अतुलशास्त्री भगरेंनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (खून), 64 (अत्याचार), 74 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), 167 (2), 140 (1), 140 (3) (अपहरण) यांसह अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा