• Mon. Jun 15th, 2026
    Pune Nasrapur Case: अशा नराधमांना भर चौकात…; फडणवीसांनी लोकभावना मांडली, पण नंतर कायद्याची चौकट सांगितली!

    CM Devendra Fadnavis: पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही सरकार म्हणून उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    नसरापूर अत्याचार प्रकरण: अशा नराधमांना भर चौकात…; फडणवीसांनी लोकभावना मांडली, पण नंतर कायद्याची चौकट सांगितली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खटल्याला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, काल मी स्वतः पीडित मुलीच्या वडिलांशी बोललो. त्यांना न्याय मिळवून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हा खटला फास्ट ट्रॅकवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. रेकॉर्डब्रेक वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लोकांच्या भावना लक्षात घेता अनेकांना वाटते की, अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, मात्र लोकशाही तसं करता येत नाही. या नरधमाला यमसदनी पाठवण्यासाठी फाशी व्हावी, याकरता संपूर्ण प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केला जाईल. न्यायालयाच्या माध्यमातून हे प्रकरण वेगाने पुढे नेलं जाईल. त्यासाठी पीडितांच्या कुटुंबीयांना एक पत्र सुद्धा देण्यात आलं आहे. कायद्यातील कोणतीही पळवाट न ठेवता आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    या घटनेनंतर पुण्यातील नवले पुलावर शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. संतप्त नागरिकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखला, ज्यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांचा रोष स्वाभाविक आहे. मात्र, काही लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत होते. पण मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की, त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. आणि चर्चा केल्यानंतर कॉल ऑफ करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. ते लोक कोण आहे हे लक्षात आलेलं आहे. मुलीच्या वडिलांनी जे काही भूमिका घेतली त्यासाठी त्यांचा आभारी आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, आरोपीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्याचे जुने गुन्हे काय आहेत, त्यावेळी काही पळवाटा राहिल्या होत्या का, याचा तपास केला जाईल. मात्र, या प्रकरणातून तो सुटू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकरणावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते स्वतःच्या आतमध्ये कधी डोकावून पाहत नाही, त्यांचा कार्यकाळात काय झालं हे कधी जाऊन पाहिलेलं नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा