Solapur Murder Case: हत्येनंतर आरोपी उल्हास मुळे पसार झाला असून, वैराग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्याचा राग; सोलापुरातील वैरागमध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर: मित्राला मारहाण झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून, एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) शहरातील दत्तनगर परिसरात घडली आहे. ही घटना २ मे रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर, वैराग) असे हत्या झालेल्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, घटनेच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चार-पाच मित्र एका दुकानाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) आणि दिनेश संतोष चव्हाण यांच्यात अचानक भांडण सुरू झाले. या वादात आरोपी उल्हास मुळे याने आपल्याजवळील हमालीचा लोखंडी हुक दिनेश चव्हाणच्या हातावर मारून त्याला जखमी केले.
हा प्रकार पाहून मयत दिनेश कापसे याने आपला जखमी मित्र दिनेश चव्हाण याला ‘तू याप्रकरणी वैराग पोलिसांत जाऊन तक्रार दे’, असा सल्ला दिला. त्यानुसार चव्हाण हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. याचाच राग आरोपी उल्हास मुळे याच्या डोक्यात गेला. त्याने दिनेश कापसे याला ‘तू चव्हाणला तक्रार देण्यास का सांगितलेस, तुला बघून घेतो’, अशी धमकी दिली होती.
घरी सोडण्याच्या बहाण्याने नेले मैदानावर
वाद झाल्यानंतर काही वेळाने, आरोपी उल्हास मुळे याने दिनेश कापसे याला ‘तुला मोटारसायकलवरून घरी सोडतो’ असे सांगून आपल्यासोबत दुचाकीवर बसवले. मात्र, त्याला घरी न सोडता आरोपीने त्याला दत्तनगर येथील नवीन मराठी शाळेच्या मैदानावर नेले. चिडलेल्या उल्हासने दिनेशच्या डोक्यात मोठ्या आकाराचा दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आणि अत्यंत निर्घृणपणे त्याचा खून केला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडलेला आढळून आला.
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
दुसऱ्या दिवशी (२ मे) सकाळी या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. या भयानक घटनेमुळे वैराग आणि विशेषतः दत्तनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा