Mumbai BEST Electric Double Decker Bus Fire: कुर्ला आगारात बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसला भीषण आग लागली. देखभालीचे काम सुरू असताना लागलेल्या या आगीत बस जळून खाक झाली असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना नेमकी का घडली, प्रशासनाने काय सांगितलं?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईमध्ये लोकलनंतर जर कोणाचा जास्त उपयोग केला जात असेल तर ती आहे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी बेस्ट. होय बेस्ट बसेसने प्रवास करण्यासाठी रोज लाखो मुंबईकर रस्त्यावर उभे असतात. बेस्टने अलिकडच्या काळान अनेक नव्या बस आणल्या आहेत. या बस अत्याधुनिक आहेतच पण त्याचसोबत त्या इलेक्ट्रिकही आहेत. दरम्यान, असं असलं तरी प्रवाशांच्या सरक्षेचा प्रश्न मात्र अधांतरीच आहे की काय, असं म्हणावं लागणारा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण आता कुर्ला बसडेपोमध्ये उभी असलेली बेस्टची नवीकोरी डबलडेकर बस ही जळून खाक झाली आहे. या आगीत संबंधित बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये एकही प्रवासी नव्हता आणि बस आगारात देखभालीसाठी उभी होती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नवी इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुर्ला डेपोत उभी होती. यावेळी तिची सर्व्हिसिंग सुरु होती. स्विच मोबिलिटी या कंपनीचे कर्मचारी बसची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करत होते. हे काम सुरु असताना अचानक या बसमधून धूर सुरु झाला. पुढच्या काही वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग प्रचंड भीषण होती. बघता बघता या आगीने संपूर्ण बसस भस्मसात केली. आगीच्या ज्वाळा आणि धूर दूरुनसुद्धा दिसत होते. ज्यामुळे प्रवाशांमध्ये काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीचे कारण काय?
दरम्यान, यासर्व प्रकाराबद्दल आता बेस्ट प्रशासनाने माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असल्याचा आम्हाला अंदाज आहे. तांत्रिक भाषेमध्ये याला थर्मल इन्सिडंट म्हटलं जातं. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये किंवा इलेक्ट्रिक वायरींगच्या मुख्य सर्किटमध्ये बिघाड होतो, आणि अशा प्रकारची आग लागू शकते, मात्र याप्रकरणातही हेच कारण आहे का नाही, याची खात्री प्रशासनाने दिलेली नाही. त्यांनी याची सखोल चौकशी करू आणि बेस्टच्या तांत्रिक समितीमार्फत अधिकृत माहिती जाहीर करु असं म्हटलं आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ‘बेस्ट’च्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस दाखल केल्या जात आहेत. या बसेस प्रवाशांच्या पसंतीसही उतरत आहेत. मात्र, आगारात देखभालीसाठी उभ्या असलेल्या बसला अशा प्रकारे आग लागल्याने या बसेसच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे. जर ही घटना बस प्रवाशांनी भरलेली असताना रस्त्यावर घडली असती, तर मोठी किती महागात पडलं असतं. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा