Pune Bhor Nasrapur Girl Death Case : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणातील आरोपीबाबात खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्याने याआधी हादरवून टाकणारे कारनामे केले आहेत.
भोर मुलगी हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमानं चिमुकलीवर जबरदस्ती करून तिला संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असताना याच प्रकरणातील आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची पुन्हा एक संतापजनक माहिती समोर आली आहे. त्याला गावातून15 ते 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे.
15 वर्षांपूर्वीच गावातून हाकलेलं
भोर प्रकरणातील आरोपीचे नाव भीमराव कांबळे असं आहे. याच आरोपीबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. हा आरोपी पहिल्यापासून विकृत प्रवृत्तीचा आहे. त्याच्या अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे त्याला गावकऱ्यांनी 15 ते 20 वर्षांपूर्वीचं त्याच्या वस्तीने तथा त्याच्याच लोकांनी गावातून हाकलून दिलं होतं. सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेही हे या ठिकाणी राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सध्या त्याच्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Pune News : पोहण्याचा मोह आला अंगलट, गटांगळ्या खात बुडाले; पुण्यात पवना नदीत तीन तरुणांचा करुण अंत
स्वत:ला वाचवण्यासाठी धक्कादायक बनाव
पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केलं. न्यायाधीशांनी आरोपीला पोलिसांविरोधात तक्रार आहे का, याची विचारणा केली असता, किरकोळ वादातून येथे आणल्याचा बचाव आरोपीने केला. Pune Nasrapur Case : पुरावे आहेत, आरोपीही समोर आहे, मग शिक्षेला उशीर का?; गुन्हेगाराला ‘शिवशाही’प्रमाणे शासन व्हावे; नसरापूर घटनेवर भगरे गुरुजींची प्रतिक्रिया आरोपीने चिमुकल्या मुलीवर जबरदस्ती केली आहे, त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वीही जबरदस्ती केली आहे का? किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का? याबाबत तपास करायचा आहे. आरोपी चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, आरोपीने चिमुकलीला कोणत्या शस्त्राने मारले? त्याचा तपास करून पुरावा गोळा करायचा आहे. आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का? याची चौकशी करायची आहे. त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली. न्यायालयाने बचाव पक्षाचं म्हणणं ऐकून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा