• Mon. Jun 15th, 2026

    TCS Company Case : आधी थंड पेय अन् शिरखुर्मातून गुंगीचं औषध दिलं, नंतर पीडितांसोबत संतापजनक कृत्य; नाशिक TCS प्रकरणात SITच्या हाती मोठे पुरावे

    TCS Company Case : आधी थंड पेय अन् शिरखुर्मातून गुंगीचं औषध दिलं, नंतर पीडितांसोबत संतापजनक कृत्य; नाशिक TCS प्रकरणात SITच्या हाती मोठे पुरावे

    Nashik TCS Company Case : काल शनिवारी या प्रकरणातील तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन या चार संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

    नाशिक टीसीएस प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : नाशिकमधील टिसीएस कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण दिवसेंदिवस अधिक बिकट होत चाललं आहे. या प्रकरणाला आता वळण लागत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या हाती अत्यंत मोठे पुरावे लागले असून, आरोपींनी पीडित महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अमानवीय मार्गांचा अवलंब केल्याचं आता समोर आलं आहे.

    शिरखुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचं औषध

    SITच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना शिरखुर्मा आणि काही थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ मिसळून दिलं होतं. या गुंगीकारक पदार्थांच्या सेवनामुळे महिलांवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या महिलांचे मनपरिवर्तन करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात होते.
    Maharashtra TimesMumbai Metro 6 : MMRDA चे सुपरफास्ट काम, नियोजित वेळेच्या निम्म्या वेळेत रेल्वे स्पॅनची उभारणी

    धर्मांतरासाठी परकीय फंडिंगचा संशय

    या संपूर्ण प्रकरणामागे फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती नसून एक मोठे धार्मिक षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे. आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि KYC कागदपत्रे तपासली असता, तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी काही संशयास्पद फंडिंग झाल्याचे पुरावे विशेष तपास पथकाच्या हाती लागले आहेत. या फंडिंगचा मूळ स्त्रोत काय आणि हे रॅकेट किती मोठं आहे? यादृष्टीने आता तपास सुरू आहे.

    निदा खानचा जामीन फेटाळला

    या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि विशेष तपास पथकाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं तिला दिलासा देण्यास नकारच दिला. निदा सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
    Maharashtra TimesPune News : पोहण्याचा मोह आला अंगलट, गटांगळ्या खात बुडाले; पुण्यात पवना नदीत तीन तरुणांचा करुण अंत

    नाशिक धर्मांतर प्रकरणात थेट ‘मलेशिया’ कनेक्शन

    येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाला आता आणखी धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशिया आणि मालेगावपर्यंत पोहोचले असल्याचा दावा विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा उलगडा झाल्ायने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा