प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे प्रहारचे काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षांतरामुळे नाराज देखील व्यक्त केलीय. याशिवाय सोशल मीडियावर सुद्धा बच्चू कडू यांना ट्रोलही केलं जात आहे. अशातच नागपुरात पोहोचलेल्या बच्चू कडू यांना माध्यमांनी प्रश्न विचारले, ज्यावर ट्रोलर्सना उत्तर देताना संतापलेल्या बच्चू कडूंंची जीभ घसरली.