Nagpur News: “मी पाच-सहा निवडणुका लढलो पण एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही. साडेतीनशे गुन्हे स्वत:वर दाखल करून घेणारा बच्चू कडू शिवाय दुसरा नेता महाराष्ट्रात सापडत नाही,” असंही ते म्हणाले.
शिवसेना प्रवेशावरून टीका; बच्चू कडू संतापले, ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना संयम सुटला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. या वेळी बोलताना त्यांचा संयम सुटल्याचे दिसून आले. “ट्रोल करणाऱ्यांनी तर प्रभू श्रीरामांना नावे ठेवली आहेत, बाबासाहेबांनाही ठेवली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही ठेवली आहेत. मी तर त्यातला एक लहानसा माणूस आहे. असे हवसे, नवसे, गवसे हे जे कोणी येतात त्याला बच्चू कडू घाबरणारा नाही आहे. ट्रोल करणाऱ्यांचे माय आणि बाप दहा जण आहेत,” असं बच्चू कडू म्हणाले .
बच्चू कडू पुढे म्हणाले की, “ट्रोल करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही, ते 50 पैशांनी विकत भेटतात. सगळ्या पक्षांकडे आम्ही पाहतो, त्यांच्या केबिन ट्रोल करणाऱ्यांनी भरलेल्या आहेत. हे सगळे ट्रोल करणारे अर्धे बिकाऊ आहेत. माझ्या बाजूने किती ट्रोल दाखवायचे ते सांगा, एक-दोन लाखांचा खर्च आहे. त्यात काही मोठी गोष्ट नाही. पण कोणी ट्रोल करत असेल तरी ‘हम कहा डरने वाले है’,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार. पण काही नालायक असतात ते काही सुटत नाही. ज्यांना सोबत राहायचे आहे त्यांनी व्यवस्थित राहावे, मी कोणालाही जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणारही नाही. माझा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मध्ये प्रहारमध्ये होता. काही मोठे मोठे लोकं कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू भाऊ पंचवीस वर्षे एकटा लढला आणि प्रहार म्हणून लढला आहे.”
राजकीय आघाड्यांबाबत होत असलेल्या टीकेवर बच्चू कडू यांनी पलटवार केला. “आता राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये विलीन होत आहे, त्याच्यावर टीका होत नाही, महानगरपालिका निवडणुकीमध्ये ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे’ एकत्र आले त्यावर आमचं काही दुमत नाही, पण त्यांच्यावर टीका होत नाही, काँग्रेस सोबत शिवसेना बसली शिवसेनेसोबत काँग्रेस बसली, त्यांच्यावर टीका करत नाही, पण बच्चू कडू बरा आहे टीका करायला,” असा टोला बच्चू कडू यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, “या सहा महिन्यांत बच्चू कडूने जीवाचे रान करून शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहे ते ते शिवसेनेच्या तोंडांत घालून आम्ही दिव्यांगांसाठी मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे धोरण नव्याने तयार करणार आहोत. शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने सक्षमपणे उभी तर राहतेच पण अधिक ताकतीने उभी करण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याच्याने कुणाची पोटदुखी होत असेल तर आम्ही त्याची पर्वा करणार नाही. मला असं वाटतं की मला आत्मविश्वास आहे आणि कार्यकर्त्यांचा बच्चू कडूवर विश्वास आहे. मी आत्मविश्वासाने चालतो, हा थांबणारा बच्चू कडू नाही आहे. ही लढाई अतिशय मोठी होईल आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होईल,” असे बच्चू कडू म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा