Maharashtra Heatwave: 1 मेपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून तीन जिल्हे सुपर हॉट राणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, विदर्भातील काही ठिकाणी 2 मे पासून पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात ऊन आणि पावसाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेने अक्षरश: कहर केला होता. हवामान विभागाने मे महिन्यासाठीही ताजा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मे महिन्यात उष्ण वातावरण कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
कोणत्या तीन जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’?
राज्यभरात मे महिन्यात तापमान झपाट्याने वाढणार आङे. अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असून या जिल्ह्यांना ‘आयएमडी’ने यलो अलर्ट दिला आहे. 1 मेपासूनच राज्याचे तापमान अत्यंत उष्ण होण्यास सुरूवात होणार आहे. बहुतेक भागांत हवामान कोरडे राहणार असले तरी अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे.शुक्रवारी, 1 मे रोजी, कोकण किनारपट्टीच्या काही भागांत वातावरण दमट राहणार आहे. येथे किमान तापमान 25 अंश सेल्सियस ते 27 अंश सेल्सियसदरम्यान असणं अपेक्षित आहेत. दरम्यान, कमाल तापमान 33 अंश सेल्सियस ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहणं अपेक्षित आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 26 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल.
मराठवाड्यात कसं असेल हवामान?
मराठवाड्यातही दिवसभर तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस असेल. दरम्यान, कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस ते 41 अंश सेल्सिस असेल. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहून कमाल तापमानाचा पारा 40 ते 43 अंशावर पोहोचण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक नागरिक उष्मघाताचे बळी पडले आहेत. नागपूरात गेल्या 10-12 दिवसांमध्ये एकूण 15 जणांना जीव गमवावा लागला आहे.
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुपारी नागरिकांना घरातून बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने नागरिकांना दिला आहे. वर्ध्यातही कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस असणार आहे.
मुंबई आणि विदर्भातील हवामान
मुंबईत 1 मेपासून पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय 2 मेपासून विदर्भातील काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा