Andheri-Goregaon Bridge: मुंबईत उत्तर-दक्षिण प्रवास सुलभ होणार आहे. पश्चिम उपनगरामध्ये एक नवा केबल-स्टेड पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा प्रतिनिधी, मुंबई: अंधेरीतील लोखंडवाला परिसर आणि गोरेगावदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना येत्या काही वर्षांत मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन गोरेगाव खाडीवर सहा पदरी केबल-स्टेड पूल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. सुमारे ४१८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे अंधेरी, ओशिवरा आणि गोरेगाव यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून लोखंडवाला जंक्शनमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध होणार
हा पूल पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांमध्ये पर्यायी उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध होईल. ओशिवरा आणि गोरेगाव परिसराला जोडण्यात हा पूल महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच, परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासह परिसरात प्रस्तावित अन्य विकासकामांमुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीच्या गरजाही या पुलामुळे पूर्ण होऊ शकतील.
बांधकामाचा कालावधी कमी करण्यासाठी महापालिकेने केबल-स्टेड डिझाइनची निवड केली आहे. या प्रकारच्या पुलासाठी तुलनेने कमी खांबांची आवश्यकता भासते. त्यामुळे खाडीतील जागेचा वापर कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा परिणामही मर्यादित राहतो. तसेच, बांधकाम अधिक वेगाने पूर्ण करणे शक्य होते.
कसा असेल पूल?
या पुलाची एकूण लांबी ५४२ मीटर असून त्यापैकी २३८ मीटरचा भाग केबल-स्टेड स्वरूपाचा असेल. पुलाची एकूण रुंदी २८.५५ मीटर असेल. सहा पदरी मार्गात प्रत्येकी तीन लेन उत्तर आणि दक्षिण दिशेकडील वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय विविध सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र जागाही राखीव ठेवण्यात येणार आहे.
BKC Public Transport Day: बीकेसीत खासगी वाहनांची वर्दळ कायम, भर उन्हात मुंबईकरांची कोंडी, ‘नो कार फ्रायडे’ पहिल्याच दिवशी का फसला?
मुंबईतील एस. व्ही. रोड आणि लिंक रोड हे प्रमुख उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग असून दिवसभर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषतः मिल्लत नगरजवळील लोखंडवाला सर्कल परिसरात वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर ओशिवरा आणि भगतसिंह नगर या महत्त्वाच्या मार्गांना लिंक रोडशी जोडणारा गोरेगाव खाडीवरील पूल महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. त्यामुळे लोखंडवाला सर्कलमधील वाहतुकीचा ताण कमी होऊन अनेक वाहनचालकांना सिग्नलमुक्त प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा