• Sat. Jun 6th, 2026
    Raj Thackeray: राजकारण्यांमुळे महाराष्ट्रातचं वाट्टोळं! राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर राज ठाकरेंची घणाघाती टीका

    Raj Thackeray Pune Speech: विविध क्षेत्रांतील मराठी माणसांचे कर्तृत्व आणि महाराष्ट्राचे योगदान आपणच विसरलो असून, महाराष्ट्र काय होता हे जाणून घ्या, अशा कानपिचक्या त्यांनी समस्त मराठीजनांना दिल्या.

    राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा.प्रतिनिधी पुणे : बिल्डरांनी महाराष्ट्राचा ताबा घेतला असून, सगळ्या बाजूंनी इमारती बांधल्या जात आहेत. राज्यकर्ते बिल्डरांना शरण गेले आहेत. डोळ्यांदेखत महाराष्ट्राची भाषा बदलत आहे. राज्यावर कोणाचेच नियंत्रण उरलेले नाही. राजकारण्यांनी महाराष्ट्राचे वाट्टोळे केले आहे,’ असे खडे बोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सुनावले.

    वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित १५१व्या वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. रोहित टिळक अध्यक्षस्थानी होते.

    देशाच्या राजधानीत मुली बसमध्ये बसू शकत नाहीत, सायंकाळी सातनंतर बाहेर फिरू शकत नाहीत. महाराष्ट्रातील मोकळेढाकळे वातावरण दुसऱ्या राज्यात नसल्याने तरुण-तरुणी येथे येतात. संत परंपरा, छत्रपती शिवराय, समाजसुधारक, क्रांतिकारक यांनी महाराष्ट्र घडवल्याने विचारांचा मोकळेपणा इथला स्थायीभाव झाला. तोच आपण आज विसरलो. प्रत्येक व्यक्तीला, लेखक, कवी, कलावंताला जातीच्या चष्म्यातून पाहू लागलो आहोत. मराठी म्हणून आपण एकत्र येऊ नये, याचा राजकारण्यांनी बंदोबस्त केला आहे, अशी घणाघाती टीका राज यांनी केली.

    Maharashtra TimesCensus In Maharashtra: आजपासून राज्यात जनगणना; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय
    महाराष्ट्राने कसे जगावे, हे शिवरायांनी त्या काळी सांगितले. मराठी शब्दकोश निर्माण करण्याचे मोठे काम महाराजांनी केले. आपण केवळ घोषणा देतो. मात्र, भाषा कशी बोलत आहोत, याकडे आपले लक्ष नाही. महान व्यक्तिमत्त्वांची जयंती आणि पुण्यतिथीला आठवण काढून हार घालून मोकळे होतो. या व्यक्तींचे विचार विसरल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे. देशातील केवळ मराठ्यांनी सव्वाशे वर्षे या भूमीवर राज्य केले. आपण हे विसरून ‘रील’मध्ये गुंतलो आहोत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

    Maharashtra TimesIPS Transfer : राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 21 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
    मराठी माणसांचा विसर
    मराठीच्या मुद्द्यावरून चिंतामणराव देशमुखांनी पं. नेहरूंकडे अर्थमंत्रिपदाचा राजीनामा फेकला होता. प्रत्येक क्षेत्रात अशी कर्तृत्ववान माणसे हा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांत अशी माणसे सापडणार नाहीत. या कर्तृत्ववान मराठी माणसांचा आपल्याला विसर पडला आहे. मोठ्या माणसांच्या नावाने इथे काही नाही. ही माणसे दुसऱ्या राज्यात जन्मली असती, तर त्यांना डोक्यावर घेतले गेले असते. महाराष्ट्र निरुत्साही झाला आहे, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

    मराठी माणसासारखा विभागलेला आणि बेसावध माणूस भूतलावर नाही. समोरचा हिंदीत बोलला की आपण सहजपणे हिंदीत बोलू लागतो. समोरचा हिंदीत बोलला तरी चालेल तुम्ही मराठीमध्येच बोला. मराठी बोलणारा हाच स्वप्नातील महाराष्ट्र आहे. मराठी बोलणार नाही हे सांगण्याची रिक्षाचालकांची हिंमत कशी होते? त्यांचे परवाने रद्द करण्याऐवजी परिवहनमंत्री चार महिन्यांची मुदत देतात. राज्याची भाषा बोलणार नाही, हे कोठूच खपवून घेतले जात नाही. – राज ठाकरे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा