Pune-Satara Highway: राष्ट्रीय महामार्ग 48वरील पुणे-सातारा पट्ट्यातील धोकादायक वळणे असलेल्या खंबाटकी घाटातील प्रवास या नवीन बोगद्यामुळे सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासात महत्त्वाचा ठरणारा खंबाटकी घाटातील प्रवास आता सोपा होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 48च्या पुणे-सातारा पट्ट्यावर असलेल्या या खंबाटकी घाटात आता एक नवा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यावर सध्या चाचण्या सुरू असून त्या यशस्वी होताच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. अतिशय वर्दळीच्या या खंबाटकी घाटातील प्रवासाचा वेळ बोगद्यामुळे कमी होणार आहे.
धोकादायक वळणांपासून सुटका मिळणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय महामार्ग 48वरील खंबाटकी घाटाच्या ऐवजी पर्यायी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील खंबाटकी घाटावर अरुंद रस्ते आणि तीव्र वळणं असल्यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. तसेच, इंग्रजी भाषेतील S च्या आकाराचे या घाटामधील मार्ग असल्यामुळे अपघातांचा धोकाही वाढतो. त्यामुळे या घाट मार्गासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कामं सुरू आहेत. या कामांमधील पहिला टप्पा म्हणजे हा बोगदा. त्यामुळे हा बोगदा सुरू होताच मार्गावरील वाहतुकीची कोंडी आणि अपघातांच्या समस्या दूर होणार आहेत.खंबाटकी घाटात सहा पदरी ट्वीन ट्यूब बोगदे तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यांनी पुण्याकडे आणि साताऱ्याकडे दोन्ही दिशेने जाण्यासाठी वाहतूक शक्य असेल. प्रत्येक ट्यूबनध्ये तीन लेन असून रोषनाई, सीसीटीव्ही कॅमेरे, रिफ्लेक्टर, गार्ड रेल आणि अग्निसुरक्षा व्यवस्थासुद्धा स्थापन करण्यात आली आहे. या सुरक्षा प्रणालींमुळे अपघाताचा धोका कमी होणार आहे. सध्या सुरक्षा चाचणीसाठी या बोगद्याचा काही भाग खुला करण्यात आला आहे.
कधी होणार संपूर्ण बोगदा सुरू?
घाटातील या बोगद्याचं सध्या 86 टक्के काम पूर्ण झालं आहे. एका बाजूचा बोगदा सुरू करून वाहतूक सुरू केली आहे. 2026च्या पहिल्या सहामाहीत हा बोगदा पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष मुंबई-पुणे-बंगळुरू कॉरिडोरवरील खंबाटकी घाटातील प्रवास कठीण ठरत होता. मार्गाच्या एका बाजूने प्रवास करताना वाहनचालकांना एका दोन पदरी अरुंद बोगद्यामधून प्रवास करावा लागत होता. दरम्यान, दुसऱ्या दिशेने जाताना 8 किमी लांब धोकादायक वळणे असलेल्या घाटातून प्रवास करावा लागत होता.
या प्रवासात वीकेंड किंवा सणाच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे घाटातील प्रवासात 15 ते 20 मिनिटे उशीर नेहमी व्हायचा. पण या नव्या बोगद्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत होणार आहे. केवळ 5 त 10 मिनिटांत घाट ओलांडून जाणं शक्य होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
कोणत्या शहरांना जोडतो खंबाटकी घाट?
खंबाटकी घाट पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भाग असून पुणे, सातारा, कोल्हापूर, आणि बेळगावसारख्या शहरांना जोडतो. तसेच, पाचगणी, महाबळेश्वर आणि कास पठारासारख्या पर्यटन स्थळांवरही सहजपणे पोहोचवतो. हे नवीन बोगदे सुरू होताच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा