• Sun. Jun 7th, 2026

    Pune Crime: पुणे हादरलं! भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; कुख्यात गुंड राणा कांबळेची हत्या, CCTV पोलिसांच्या हाती

    Pune Crime: पुणे हादरलं! भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; कुख्यात गुंड राणा कांबळेची हत्या, CCTV पोलिसांच्या हाती

    Pune Murder Case: स्थानिक नागरिकांनी कांबळे याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पुणे हादरलं! भर रस्त्यात कोयत्याने हल्ला; कुख्यात गुंड राणा कांबळेची हत्या, CCTV पोलिसांच्या हाती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शहरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत असून गंगानगर परिसरात भर रस्त्यात तडीपार गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राणा कांबळे असे मृत गुंडाचे नाव असून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून तपासाला वेग आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राणा कांबळे हा गेल्या अनेक महिन्यांपासून तडीपार होता. मात्र, तडीपार असतानाही तो गंगानगर परिसरात सक्रिय होता आणि स्थानिकांमध्ये त्याची दहशत होती. त्याच्याविरोधात चोरी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.

    दरम्यान, गंगानगर परिसरात राणा कांबळे आणि ओम मोरे यांच्यात वर्चस्वाच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद चिघळल्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी कांबळेला रस्त्यात गाठले. सुरुवातीला त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी कोयत्यांनी कांबळेवर जीवघेणा हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की कांबळे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळला.

    विशेष म्हणजे, या हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तो व्हिडिओ ताब्यात घेतला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    दरम्यान, पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांत तीन हत्यांच्या घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातही दोन हत्या झाल्या होत्या. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे आदेश दिले असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गुन्हेगारांचा वाढता हैदोस पाहता पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. शहरात रोज रोज होणारे कोयत्याचे हल्ले, गोळीबार आणि वाढती गुन्हेगारी हे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत असून या थरारक घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा