• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : गप्पांच्या ओघात काढलेला ‘तो’ एक शब्द जिवावर बेतला! पिंपरीत तरुणावर भयावह हल्ला; निगडीत काय घडलं?

    Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडच्या निगडीत खळबळजनक घटना घडली आहे. फक्त एक शब्द म्हटल्याच्या रागातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणात माजी नगरसेवकाच्या नातेवाईकाचे नाव समोर येत आहे.

    पिंपरीत एका शब्दावरून भयानक प्रकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पिंपरी- चिंचवड, श्रीकृष्ण पांचाळ: निगडी परिसरात मित्रांमधील किरकोळ वादातून गंभीर गुन्हा घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केस वाढवलेल्या मित्राला ‘पोतराज’ म्हणाल्याचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अथर्व गणेश शिंदे (वय 20) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व शिंदे हा निगडी गावठाण येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी पवन, यश आणि गणेश लोणकर हे सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात गणेश लोणकरचे केस लांब असल्याने अथर्वने त्याला ‘पोतराज’ असे संबोधले. या शब्दामुळे संतापलेल्या गणेशने वाद घालत भांडण सुरू केले. काही वेळातच शाब्दिक बाचाबाची वाढली. मात्र, पवन आणि यश यांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता शांत केला.

    “मारुन टाका..”

    यानंतर सर्वजण रिक्षाने भेळ चौकात गेले. काही वेळानंतर आकाश खिरडे याचा फोन आल्याने अथर्व, पवन आणि यश हे त्याला भेटण्यासाठी पुन्हा निगडी बसस्टॉपकडे रवाना झाले. रिक्षा थांबवत असताना आकाश आणि विकास खिरडे यांनी अथर्वला पाठीमागून पकडले, तर निहालने त्याचे हात आवळले. त्याच वेळी “आज सोडू नका, मारून टाका” असा इशारा देत गणेश लोणकरने अथर्ववर चाकूने हल्ला केला.

    Maharashtra TimesMHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईतील 2,640 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

    या हल्ल्यात अथर्वच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. मित्र पवन आणि यश यांनी मदतीसाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धमकावले. हल्ल्यानंतर गणेश लोणकर, आकाश खिरडे, विकास खिरडे आणि निहाल हे सर्वजण घटनास्थळावरून फरार झाले.

    माजी नगरसेवकांच्या भाच्याचा समावेश?

    जखमी अवस्थेत अथर्वला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. घटनेत माजी नगरसेवकांच्या भाचाचा समावेश असल्याचं बोललं जातं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा