Nagpur Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच घरातील तिघांचा करुण अंत झाला आहे.
वारुड अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : आनंदाने आणि उत्साहाने सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच शोकांतिका ठरल्याची हृदयद्रावक घटना काल मंगळवारी उघडकीस आली. कामठी तालुक्यातील खैरी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा वरुडजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला असून खैरी गावात शोककळा पसरली आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, खैरी येथील विनायक कॉलनीत राहणारे नंदणे कुटुंब अकोला येथे एका नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी कारने जात होते. वर्षभरापूर्वीच हे कुटुंब खैरी येथे राहायला आले होते. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदात आणि उत्साहात या सोहळ्यासाठी रवाना झाले होते. मात्र, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.दरम्यान, वरुडजवळ पोहोचताच अचानक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. वळण घेत असताना कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातात पुढील सीटवर बसलेले समाधान किसनराव नंदणे (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर इतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, 28 वर्षीय किरण गोपाल नंदणे आणि तीन वर्षांची चिमुकली दिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 34 वर्षीय गोपाल समाधान नंदणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की…
प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देत बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतलं. मात्र, तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची बातमी खैरी गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या अपघातात निष्पाप तीन वर्षांच्या चिमुकलीचाही बळी गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लग्नसमारंभाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या कुटुंबासाठी हा प्रवासच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. या हृदयद्रावक घटनेनं केवळ एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला नाही, तर समाजमनही सुन्न केलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा