पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांवर होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपकडून काल पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता इतर पक्षांमध्येही उमेदवार निश्चितीसाठी हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला या निवडणुकीत एक जागा येणार असून या जागेवर कोणाला संधी द्यायची, यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये विविध नावांवर चर्चा झाली असून भाजपचे सहयोगी खासदार राहिलेल्या संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हेदेखील उमेदवारीसाठी स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी आणि माझा मुलगा भाजपसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
“राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी माझ्या मुलाच्या नावाची जी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. पण मी आणि माझा मुलगा भविष्यातही 100 टक्के भाजपमध्ये राहील, हे मी खात्रीने सांगतो. माझा मुलाची पार्थ पवार यांच्याशी मैत्री आहे, परंतु त्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याचा काहीही विषय नाही. मी आज त्याच्याशी याबाबत चर्चा करणार असून पुढेही आम्ही भाजपमध्ये राहणार आहोत,” असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीत विधानपरिषदेसाठी कोणाकोणाच्या नावाची चर्चा?
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीला खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे उपस्थित होते. देवगिरी निवासस्थान इथं झालेल्या या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. यामध्ये विक्रम काकडे यांच्यासह उमेश पाटील, झिशान सिद्धकी, राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार हे नेतेही स्पर्धेत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “आज संध्याकाळपर्यंत विधानपरिषद उमेदवारीबद्दल निर्णय होईल. आज कॅबिनेट बैठक आहे. मलाही जेपीसीला जायचे आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. प्रादेशिक समतोल आणि इतर समतोल राखण्याचा विचार आम्ही करत आहोत. पक्षात ७० ते ७५ इच्छूक असून सर्वांना उमेदवारी मिळू शकणार नाही हे स्वाभाविक आहे. आज आमचे संख्याबळ ४१ आहे. उद्या आमच्याकडून अर्ज भरला जाईल,” अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा