Maharashtra Heatstroke: राज्यात तापमानात सतत वाढ होत असून गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. उपराजधानीत उष्मघाताने 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्म्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. या उन्हाच्या दिवसांत विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तापमानामध्ये जेव्हा वाढ होते, तेव्हा उष्णतेशी संबंधित आजार आणि उष्माघाताची प्रकरणे वाढीस लागतात. सतत घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे प्रचंड थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, सतत झोप येणे किंवा निद्रानाश, भूक मंदावणे, हातापायाची, डोळ्यांची आग होणे, मळमळ, उलटी यांसारख्या लक्षणांची तीव्रता वाढते. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी काही बाबींचे पालन करायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्वचेचे विकार
उष्णतेमुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, लहान पुरळ किंवा फोड येऊ शकतात. हे अधिक घाम येणाऱ्या शरीराच्या भागांमध्ये दिसून येते. योग्य काळजी न घेतल्यास त्या भागात संसर्ग होण्याची शक्यताही वाढू शकते.IMD Weather Alert: महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून नागरिकांना कडक सूचना, कोणत्या गोष्टी टाळाव्या लागणार?
याचे पालन करा
उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य ठेवणे गरजेचे आहे. हलक्या रंगाचे, सैल आणि शक्यतो सुती कपडे घालावेत. छत्री, टोपी, स्कार्फचा वापर करावा. उन्हात जास्त वेळ उभे राहणे टाळावे. तेलकट पदार्थ टाळावेत. अतिथंड पेयांचा मारा करू नये.
‘ओआरएस’चा पर्याय
जास्त घाम आल्यामुळे शरीरातून पाणी आणि क्षार दोन्ही बाहेर पडतात. ही कमतरता भरून काढताना फक्त साधे पाणी घेणे पुरेसे नसते. थकवा व तहान अधिक असेल तर ‘ओआरएस’ घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंमध्ये आकडी येण्यापासून गोंधळल्यासारखे वाटणे, उच्चार अस्पष्ट, गोंधळल्यासारखी अवस्था निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात.
औषधे वेळेवर घ्या
‘उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे सहआजार असतील, तर वेळेवर दिलेली औषधे घ्या. भूक मंदावली की काही रुग्ण औषधांची एखादी मात्रा घेत नाहीत; तसे केल्याने लक्षणांची तीव्रता अधिक वाढू शकते, हे विसरू नका,’ असा सल्ला फिजिशिअन डॉ. संज्योत गोरे यांनी दिला.
नागपुरात उष्माघाताने १५ जणांचा मृत्यू
राज्यात अनेक ठिकाणी तापमानात सतत वाढ होत असून गेल्या दहा दिवसांमध्ये उपराजधानीत उष्माघाताने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत हे संशयित उष्माघाताचे बळी असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भात मागील २४ तासांत तापमानात किंचित घट नोंदवली गेली असली, तरी उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे चित्र आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. अकोला व अमरावती येथे सर्वाधिक ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यात ४५ अंश तापमान राहिले. नागपूरमध्येही कमाल तापमान ४४.४ अंशांवर स्थिरावले.
Hottest City in India : अकोला देशात सर्वात उष्ण शहर, पारा 46.9 अंशांवर; थंड हवेची ठिकाणंही गरमागरम, महाबळेश्वर-माथेरान 33 पार
एसीतून बाहेर उष्म्यामध्ये आणि उष्म्यातून थेट एसीमध्ये जाणे टाळा.
थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा.
शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत.
अतितिखट, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.
भूक लागल्यानंतर चहा, कॉफी, शीतपेयांपेक्षा सुकामेवा, एखादे फळ यांचा आहारामध्ये समावेश करावा.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा