Chembur Metro Station: डायमंड गार्डन-मंडाले पट्ट्यावरील दररोज सुमारे 300 प्रवाशांचीच नोंद होते आहे. यामुळे एमएमआरडीए मुंबईच्या मेट्रो लाइन 2 बी वरील चेंबूर मेट्रो स्टेशन सुरू करण्याच्या कामाला गती देत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: एप्रिल महिन्यात मुंबईत दोन मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण झालं. त्यापैकी मेट्रो लाइन 2बी वर निराशाजनक प्रवासी संख्या असल्याचं वास्तव आहे. त्यामुळे या मार्गावरील चेंबूर मेट्रो स्थानक लवकरात लवकर सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. येत्या जून महिन्यापूर्वीच मेट्रो लाइन 2बी वरील चेंबूर मेट्रो स्थानक सुरू करण्यासाठी एमएमआरडीएच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मेट्रो 9 आणि मेट्रो 2बी
एमएमआरडीएने चेंबूर मेट्रो स्थानकावरील सर्व बांधकाम यापूर्वीच पूर्ण केलं आहे. त्यानंतर आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून अनिवार्य सुरक्षा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. लवकरच या मेट्रो स्थानकावर चाचण्या सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो लाइन 2बी मार्गावरील डायमंड गार्डनर ते मंडाळेपर्यंत मेट्रोचे लोकार्पण झाले होते. याच दिवशी लोकार्पण झालेल्या मुंबई मेट्रो 9, दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रोला प्रवाशांनी मोठा प्रमाणात प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी मेट्रो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र होते. पण मेट्रो 2बी वर अपेक्षेहून कमी प्रवासी नोंदले गेले.Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?
एमएमआरडीने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार सध्या या मेट्रो मार्गिकेवर केवळ 300 प्रवाशांची नोंद होते. या मार्गावरील प्रवासी वाढवण्यासाठी पावले उचलले जात आहेत. यामुळे चेंबूर स्थानकाचं लोकार्पण करून मेट्रोचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या या मेट्रोच्या केवळ एका टप्प्याची सुरूवात करण्याची योजना होती. ही संपूर्ण मार्गिका डायमंड गार्डन ते सारस्वत नगरपर्यंत आहे. दुसऱ्या टप्प्यात मंडाळे ते सारस्वत नगर टप्पा सुरू होणार होता. ही संपूर्ण मार्गिका 2027मध्ये सुरू होणार होती. याच टप्प्यात चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश होता. परंतू, आता प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एमएमआरडीए दुसऱ्या टप्प्यातील हे एक मेट्रो स्थानक वेळेपूर्वीच सुरू करणार आहे.
लवकरच स्थानक सुरू होणार
अधिकाऱ्यांनी चेंबूर मेट्रो स्थानक पूर्णपणे तयार असल्याची माहिती दिली आहे. केवळ CMRSकडून मान्यता मिळाली की हे स्थानक सुरू होणार आहे. त्यामुळे मे महिनाअखेरपर्यंत किंवा जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत या स्थानकाचं लोकार्पण होईल. यामुळे चेंबूर ते मंडाळे थेट मेट्रो कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे.
ST Bus: लालपरीचा प्रवास अधिक सुखकर होणार! 1 मेपासून ‘आपली बस, आपली सेवा’ उपक्रम; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
दरम्यान, चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल कॉरेडोरवर कमी प्रवासी संख्या नोंदवण्यात आली होती. सध्या ही मार्गिका बंद आहे. एमएमआरडीए मोनोरेल आणि मेट्रो स्थानकापर्यंत एक नवा पादचारी पूल बांधणार आहे. हा पूल चेंबूर मेट्रो स्थाकाला वी.एन.पूरव मार्ग-आर.सी मार्ग मोनोरेल स्थानकाला जोडणार आहे. या पादचारी पुलाचं काम सध्या सुरू आहे.
मेट्रो लाइन 2बी अंधेरी पश्चिमेपासून मानखुर्दमधील मंडाळेपर्यंत जोडते. ही संपूर्ण मार्गिका 23.64 किमी लांब असून सध्या टप्प्या-टप्प्याने काम सुरू आहे. पहिला टप्पा कार्यरत असून उर्वरित मार्गावर काम सुरू आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा