• Sat. Jun 6th, 2026

    Pune Metro: स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी बस थांबे हटवणार, पुणे-सातारा मार्गावर मोठे बदल; भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग

    Pune Metro: स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी बस थांबे हटवणार, पुणे-सातारा मार्गावर मोठे बदल; भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग

    Swargate-Katraj Metro: ही मार्गिका पुणे-सातारा मार्गावर थेट मुख्य रस्त्याखाली बांधण्यात येत आहे. त्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांसाठी मुख्य मार्गावरील बस थांबे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    पुणे: पुण्यात सध्या स्वारगेत ते कात्रज मेट्रो स्थानकांचं काम सुरू झालं आहे. ही मार्गिका पूर्णपणे भुयारी असून यामुळे स्वारगेट-कात्रज बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) कॉरिडॉरवरील दोन बस थांबे स्थलांतरित केले आहेत. या बांधकामाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-सातारा मार्गावर आता बीआरटी स्थानकं हळूहळू गायब होणार आहे. सध्या शाहू कॉलनी – नाटाबाग बीआरटी स्थानकाच्या पाडकामाची दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.

    बिबवेवाडीचा थांबा हलवला

    स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेचे बोगदे थेट मुख्य रस्त्याखाली बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीआरटी स्थानकं भुयारी मेट्रोच्या स्थानकांसाठी लागणारी जागा अडवत आहेत. या जागेत मेट्रोचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तयार केले जाणार आहेत. त्यामुळे हे थांबे हटवण्यात आले आहेत. त्यात या पट्ट्यावर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. मग हे थांबे हलवणे अपरिहार्य आहे. महा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी, चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, बिबवेवाडीजवळ सुरू असलेले काम हे भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकाम आणि संबंधित संरचनात्मक कामांशी निगडित आहे.Maharashtra TimesMumbai Metro 2B: चेंबूर स्थानकाचं वेळेपूर्वी लोकार्पण होणार! ‘मेट्रो 2बी’वरील अल्प प्रतिसादामुळे निर्णय; दररोज केवळ 300 प्रवाशांची नोंद

    “बिबवेवाडी स्थानकाच्या जागेवर सपाटीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर बीआरटी कॉरिडॉरची एक बाजू वाहतुकीसाठी वापरली जाईल. दुसऱ्या बाजूला बॅरिकेड्स लावलेल्या भागाचा वापर पाइलिंग आणि इतर बांधकाम कामांसाठी केला जात आहे,” असे ते म्हणाले. या बदलांचा एक भाग म्हणून, तात्पुरता नातू बाग बस थांबा पदपथावर हलवण्यात आला आहे. जे प्रवासी पूर्वी रस्त्याच्या मधल्या बाजूच्या बीआरटी प्लॅटफॉर्मवरून बस पकडत असत, त्यांना आता रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर थांबावे लागेल.

    बसचा मार्गही बदलणार

    दरम्यान, अधिकाऱ्यांनी असेही सांगितले आहे की काही भागांमध्ये बीआरटी बसचे मार्ग सुद्धा बदलावे लागणार आहेत. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत या बसना मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे आधीच कोंडी असलेल्या पुणे-सातारा रोडवर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

    स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज या पाच स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर सध्या बिबवेवाडी, पद्मावती आणि बालाजी नगर ही स्थानकं बीआरटी मार्गावर आहेत. आता बिबवेवाडीनंतर उर्वरित स्थानकंही टप्प्याटप्प्याने हलवले जातील असा अंदाज आहे. प्रवाशांना कमीतकमीत त्रास व्हावा म्हणून हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे.

    Maharashtra TimesPune Metro: पुणे शहराबाहेर मेट्रोचा विस्तार! उपनगरामध्ये 4 नव्या मार्गांचा प्रस्ताव; खेड-शिवापूर टोलनाक्यापर्यंत जोडणार

    सातारा रोडवर मोठे बदल

    अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील म्हणाले की, एकदा मेट्रोच्या कामाला गती मिळाल्यावर, सातारा रोडचा मोठा भाग बांधकामासाठी ताब्यात घेतला जाईल. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. सातारा रोड कॉरिडोर हा सध्या शहरातील एकमेव मार्ग आहे जिथे बीआरटी अजूनही कार्यरत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा